ETV Bharat / state

रात्री 11 आधी पार्टी आटोपण्याचे मुंबई महापालिकेचे आवाहन; हॉटेल्सना 'ही' सूट - New Year Mumbai Hotels Parcel Service

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे स्वागत केले जात आहे. हे नववर्ष सर्वसाधारण नसल्याने कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करत रात्री ११ वाजेपर्यंत पार्टी आटोपून घ्या, असे आवाहन मुंबई महापालिकेने मुंबईकरांना केले आहे. तसेच, आज रात्री ११ नंतर दिड वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टोरंटना होम डिलिव्हरी आणि पार्सल नेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

New Year Party Mumbai
रात्री 11 आधी पार्टी ओपण्याचे पालिकेचे आवाहन
author img

By

Published : Dec 31, 2020, 3:44 PM IST

Updated : Dec 31, 2020, 4:35 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे स्वागत केले जात आहे. हे नववर्ष सर्वसाधारण नसल्याने कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करत रात्री ११ वाजेपर्यंत पार्टी आटोपून घ्या, असे आवाहन मुंबई महापालिकेने मुंबईकरांना केले आहे. तसेच, आज रात्री ११ नंतर दिड वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टोरंटना होम डिलिव्हरी आणि पार्सल नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचे हॉटेल, रेस्टोरंटच्या 'आहार' या संघटनेने स्वागत केले आहे.

माहिती देताना हॉटेल, रेस्टॉरंटच्या 'आहार' संघटनेचे सुधाकर शेट्टी

हेही वाचा - महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांची सीआयएसएफ डीजी म्हणून नेमणूक

घरातच नववर्षाचे स्वागत करा -

मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. गेले दहा महिने पालिका, आरोग्य विभाग कोरोनाचा प्रसार रोखण्याचे काम करत आहेत. पालिका आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरी पूर्णपणे गेलेला नाही. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार होत असल्याने पालिकेने वेळोवेळी गर्दी करू नका, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, असे आवाहन केले आहे. त्यानंतरही मुंबईत नाईट क्लब, पबमध्ये गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने यंदा नववर्षाचे स्वागत करताना कार्यक्रमे रात्री ११ च्या आत आटोपावे. घरातूनच नव वर्षाचे स्वागत करा, असे आवाहन केले आहे. चौपाट्या आणि गर्दी होणाऱ्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन पालिकेने केले आहे.

रात्री दीड पर्यंत होम डिलिव्हरी -

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रात्री पार्ट्या आयोजित केल्या जातात. घरातही हॉटेलमधील जेवण मागवले जाते. सरकार आणि पालिकेने रात्री ११ पर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. रात्री ११ नंतर हॉटेल सुरू ठेवता यावे, होम डिलिव्हरी करता यावी म्हणून आम्ही सरकार आणि पालिकेकडे मागणी केली होती. या मागणीचा विचार करून पालिकेचे अतिरक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रात्री ११ नंतर दिड वाजेपर्यंत होम डिलिव्हरी आणि पार्सलसाठी परवानगी दिल्याची माहिती हॉटेल, रेस्टॉरंटच्या 'आहार' संघटनेचे सुधाकर शेट्टी यांनी दिली. रात्री ११ नंतर पार्सल मिळणार असल्याने, तसेच होम डिलिव्हरी मिळणार असल्याने त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

हेही वाचा - नवीन वर्षाच्या पार्टीसाठी जमा केलेले पैश्यांतून केली गरजूंना मदत

Last Updated : Dec 31, 2020, 4:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.