मुंबई Mumbai Metro special train : नवरात्रोत्सवात गरब्याचा आनंद लुटण्यासाठी लाखोंच्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडतात. याच काळात नागरिकांना रात्रीच्या वेळी प्रवास करावा लागतो. पण त्यासाठी बऱ्याच अडचणी निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतं. त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास करता यावा या हेतूनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी सुद्धा मेट्रो धावणार असा निर्णय घेत प्रवाशांना अतिरिक्त सेवा देण्याचा निर्णय घेतलाय.
14 अतिरिक्त फेऱ्यांची भेट : नवरात्रोत्सव दरम्यान एकूण 14 अतिरिक्त गाड्यांची सेवा वाढवण्यात आली आहे. 19 ऑक्टोबरपासून ते 23 ऑक्टोबरपर्यंत मेट्रो मार्ग दोन अ पासून अंधेरी पश्चिम आणि मेट्रोमार्ग सातच्या गुंदवली रेल्वे स्थानकावरून शेवटची मेट्रो ट्रेन ही बारा वाजून वीस मिनिटांनी सोडण्यात येणार आहे. त्यामुळं अंधेरी वरून घाटकोपर पर्यंतदेखील येता येईल. आणि पश्चिम रेल्वेवरील मेट्रोच्या विविध रेल्वे स्थानकांवर देखील मेट्रो धावणार आहे.
रात्री 1.30 वाजेपर्यंत धावणार मेट्रो : सध्या मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 या मार्गांवर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 5.55 ते रात्री 10.30 या कालावधीत सुमारे 253 इतक्या फेऱ्या होतात. तसंच शनिवारी याच मेट्रोच्या 238 आणि रविवारी 205 इतक्या फेऱ्या असतात. या फेऱ्या दर साडे दहा मिनिटांच्या अंतरानं सुरु असतात. पण आता नवरात्रोत्सवाच्या कालावधीमध्ये 15 मिनिटांच्या फरकानं या अतिरिक्त फेऱ्या धावणार आहेत. या अतिरिक्त सेवांच्या कालावधीत मेट्रो मार्ग 2 अ येथील अंधेरी (पश्चिम) आणि मेट्रो मार्ग 7 वरील गुंदवली या स्थानकावर शेवटची मेट्रो रात्री 1.30 वाजता पोहोचेल. त्यामुळं प्रवाशांसाठी आणि भाविकांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब आहे.
हेही वाचा -
- Navratri 2023 Day 1 : शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करा देवी शैलपुत्रीची उपासना; जाणून घ्या कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धती आणि रंग
- Navrati 2023: शारदीय नवरात्रोत्सवासाठी मुंबईतील महालक्ष्मी मंदिर सज्ज, 'अशी' आहे भाविकांसाठी व्यवस्था
- Navratri 2023 : नवरात्रीचे नऊ दिवस; 'ही' आहेत माता दुर्गेची नऊ रूपे...