मुंबई - मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणारी लोकल 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. याची घोषणा होताच आता मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) ने वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 च्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून 6.50 ते 10.15 या वेळेत मेट्रो 1 धावणार आहे. सद्या ही सेवा 7.50 ते 10.15 या वेळेत सुरू आहे.
दररोज 80 हजार प्रवासी करतात मेट्रोने प्रवास
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अर्थात 22 मार्चपासून 18 ऑक्टोबरपर्यंत मेट्रो 1 सेवा बंद होती. राज्य सरकारने ऑक्टोबरमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दिल्यानंतर 19 ऑक्टोबरला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या बदलासह ही सेवा सुरू झाली. सुरुवातीला मेट्रो 1 च्या केवळ 200 फेऱ्याच सुरू करण्यात आल्या. पण पुढे पुढे परिस्थितीचा अंदाज घेत एमएमओपीएल फेऱ्या आणि वेळ गेली आहे.
सद्या वर्सोव्यावरून पाहिली ट्रेन सकाळी 7.50 ला सुटते. तर शेवटची ट्रेन घाटकोपरवरून रात्री 10.15 ला सुटते. त्यानुसार आता मेट्रो प्रवासी वाढू लागले आहेत. कोरोना काळात सर्वात सुरक्षित अशी सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था आहे. त्यामुळे याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच शनिवारी-रविवारी वगळता इतर दिवशी दररोज मेट्रो 1 ने 80 हजार प्रवासी प्रवास करतात.
मेट्रो 1 चे वेळापत्रक पूर्ववत होण्यास मात्र अजून काही वेळ पहावी लागणार वाट
मेट्रो 1 च्या मूळ वेळापत्रकानुसार सकाळी 5.30 ते रात्री 11.30 या वेळेत मेट्रो धावते. पण कोरोना काळात अनेक निर्बंध आल्याने आणि खबरदारी घेणे गरजेचे असल्याने मेट्रो 1 च्या फेऱ्या आणि वेळ कमी करण्यात आली होती. पण आता मुंबईत कोरोना नियंत्रणात येत आहे. त्यामुळे आता मेट्रो 1 चे ही वेळापत्रक पूर्ववत करावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. पण आता तात्काळ वेळापत्रक पूर्ववत करता येणार नाही. अजूनही कोरोना संपलेला नाही. त्यामुळे मेट्रो 1 चे वेळापत्रक पूर्ववत होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार. पण आता 1 फेब्रुवारीपासून मात्र काही फेऱ्या वाढणार असल्याने हा नक्कीच प्रवाशाना दिलासा आहे.
लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यास लोकल प्रवाशांमध्ये वाढ होणार आहेत. तर लोकलने प्रवास करणारे प्रवासी पुढे वर्सोवा ते घाटकोपर प्रवास करण्यासाठी मेट्रोचा पर्याय निवडतात. ही बाब लक्षात घेत 1 फेब्रुवारीपासून एमएमओपीएलने मेट्रो 1 ची वेळ वाढवली आहे.
हेही वाचा - 'या' वेळेत लोकल प्रवास केल्यास होणार कारवाई
हेही वाचा - नवी मुंबई; वाहतूक शाखेच्या 'रस्ता सुरक्षा अभियाना'त न्यायव्यवस्था सहभागी