मुंबई - रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी कामांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने मेगा ब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत असणार आहे. सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. या रेल्वे संबंधित स्थानकांवर थांबणार आहेत.
सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्या संबंधित स्थानकावर थांबणार आहे. पुढे, त्या पुन्हा अप जलद मार्गावर वळविल्या जाणार आङेत. रेल्वे नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने त्यांच्या ठिकाणी पोहोचणार आहेत.
हार्बर मार्गावर असा असेल ब्लॉक- कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. पनवेल, बेलापूर, वाशीसाठी सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या सर्व डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल, बेलापूर, वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ या कालावधीत अप हार्बर मार्गावरील सर्व सेवा बंद राहणार आहेत. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला सेक्शनवर विशेष उपनगरीय सेवा चालवल्या जाणार आहेत. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर लाईन सेवा सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत उपलब्ध असणार आहे.
पश्चिम रेल्वेचे असे आहे वेळापत्रक- बोरीवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर आणि डाऊन जलद मार्गावर चार तासांचा जंबो ब्लॉक सकाळी 12:40 ते पहाटे 4:40 या वेळेत ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल करण्यासाठी घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत अप धीम्या मार्गावरील सर्व गाड्या विरार/वसई रोड आणि बोरिवली दरम्यान अप जलद मार्गावर चालवल्या जातील. सर्व डाऊन जलद गाड्या गोरेगाव ते वसई रोड/विरार स्थानकादरम्यान डाऊन धिम्या मार्गावर चालवल्या जातील.
हेही वाचा-