ETV Bharat / state

Mumbai Mayor Awareness on Corona Guidelines : निर्बधांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौरांनी रस्त्यावर उतरून केली जनजागृती

author img

By

Published : Jan 9, 2022, 5:21 PM IST

Updated : Jan 9, 2022, 7:23 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नका, मास्कचा वापर करा अन्यथा कठोर कारवाई करण्याचे आदेशही राज्य सरकारने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेटवे ऑफ इंडिया, ( Mumbai Mayor on Gateway of India ) गिरगाव चौपाटी तसेच जुहू चौपाटी अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन आढावा घेत नागरिकांना आणि पर्यटकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले.

Mumbai Mayor Awareness on Corona Guidelines
मुंबईच्या महापौरांनी रस्त्यावर उतरून केली जनजागृती

मुंबई - मुंबईसह राज्यात डिसेंबरपासून पुन्हा कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. ( Corona Patients Increasing In Mumbai ) या प्रसाराला रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्बध आज रात्रीपासून लागू केले आहेत. ( Guidelines Issued by MH Government Over Corona ) गर्दी करू नका, मास्कचा वापर करा अन्यथा कठोर कारवाई करण्याचे आदेशही राज्य सरकारने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेटवे ऑफ इंडिया, ( Mumbai Mayor on Gateway of India ) गिरगाव चौपाटी तसेच जुहू चौपाटी अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन आढावा घेत नागरिकांना आणि पर्यटकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचा नागरिकांशी संवाद

महापौरांकडून जनजागृती -

कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असताना अनेक सार्वजनिक ठिकाणी मुंबईकर गर्दी करताना दिसत आहेत. प्रशासनाकडून सातत्याने सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा, असे आवाहन केले जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते आहे. पालिकेकडून कारवाई सुरू असूनही अनेक जण मास्कविना फिरत असल्याची स्थिती आहे. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणणे महत्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारने निर्बंध लागू केले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेटवे परिसरात जाऊन याबाबतचा आढावा घेतला. ( Mumbai Mayor Kishori Pednekar Awareness over Corona ) येथील रस्त्यावर उतरून नागरिकांना मास्क लावण्याबाबत त्यांनी जनजागृती केली. मास्क लावा, गर्दी करू नका, नियम पाळा अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर महापौरांनी गिरगाव आणि जुहू चौपाटी येथेही जाऊन पाहणी केली.

राज्य सरकारने लावलेले निर्बंध -

राज्यात रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. या काळात अत्यावश्यक सेवेशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. तसेच शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदाने, उद्याने, चित्रपटगृहे, केशकर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. मुंबई लोकल प्रवासासाठी कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. नव्या नियमानुसार रात्रीची संचारबंदी ११ वाजता सुरू होऊन ती पहाटे ५ वाजेपर्यंत लागू राहील. राज्यातील पर्यटन स्थळेही बंद ठेवण्यात येतील. मैदानांवरील खेळांवरही बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील महाविद्यालये आणि शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंदच राहतील. नाट्य आणि चित्रपटगृहांमधील प्रेक्षकांची संख्या ५० टक्के इतक्या क्षमतेनेच सुरू राहतील. सलून आणि खासगी कार्यालयांमध्येही ५० टक्क्यांच्या उपस्थितीला मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करणार्‍यांना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. ते न घेतलेल्यांना बसप्रवास वर्ज्य ठरवण्यात आला आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवली जातील. येथेही दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल. स्पा, स्वीमिंग पूल आणि व्यायामशाळा बंद ठेवण्यात येतील.

हेही वाचा - Liquor Shops Have To Close : ..तर दारुची दुकानेही बंद करावी लागतील, आरोग्यमंत्र्यांचा इशारा

अशी असणार नवी नियमावली -

  1. रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी
  2. सकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी (५ लोकांपेक्षा अधिक एकत्र येण्यास बंदी)
  3. मैदाने, उद्याने पर्यटन स्थळे बंद
  4. शाळा, कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
  5. थिएटर ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार
  6. सलून आणि खासगी कार्यालय ५० टक्के क्षमतेने सुरू
  7. लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक ट्रेन बसने प्रवास करण्यास मुभा
  8. हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा
  9. स्विमिंग पूल, स्पा, पूर्णपणे बंद
  10. ब्युटी पार्लर, जीम ५० टक्के सुरु ठेवण्यास परवानगी
  11. धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रम फक्त ५० लोक
  12. मॉल्स, व्यापारी संकुले ५० टक्के क्षमतेने. अन्य अटी कठोर. रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद.
  13. दहावी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांनी वेळोवेळी मार्गदर्शन करावे
  14. तरणतलाव बंद राहणार
  15. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा वगळता अन्य स्पर्धा किंवा खेळ लांबणीवर. स्पर्धामध्ये प्रेक्षकांना प्रवेशबंदी.
  16. मनोरंजन उद्याने, प्राणी संग्रहालये, किल्ले बंद राहणार

Last Updated : Jan 9, 2022, 7:23 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.