ETV Bharat / state

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल - मुंबई महापौर प्रकृती

महापौरांना युरिनचा त्रास असल्याने तपासणी केली असता किडनीमध्ये स्टोन असल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्यांना सैफी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचे एक लहानशी शस्त्रक्रियाही होणार असून त्यासाठी पुढील तीन ते चार दिवस महापौरांना रुग्णालयात ठेवले जाणार आहे.

mumbai mayor  mumbai mayor kishori pednekar  kishori pednekar admit hospital  किशोरी पेडणेकर महापौर  मुंबई महापौर प्रकृती  मुंबई महापौर रुग्णालयात दाखल
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Jun 29, 2020, 3:01 PM IST

Updated : Jun 29, 2020, 3:27 PM IST

मुंबई - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महापौरांना युरिनचा त्रास असल्याने तपासणी केली असता किडनीमध्ये स्टोन असल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्यांना सैफी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पुढील तीन ते चार दिवस त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यादरम्यान मुंबईकरांना वेळेवर उपचार मिळत आहेत की नाही? याची पाहणी करण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर सतत रुग्णालयांना भेटी देत होत्या. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षेची साधने मिळावीत यासाठी महापौर सतत गाठीभेटी घेत होत्या. मुंबईतून कोरोनाला हरविण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध बैठका महापौर घेत होत्या. गेल्या तीन महिन्यात महापौरांची अविश्रांत धावपळ सुरू आहे.

महापौरांना दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांकडून औषध घेतले होते. यामुळे त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले होते. त्यांना युरिनचा त्रास जाणवत असल्याने त्यांची तपासणी केली असता किडनीमध्ये स्टोन असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे त्यांना चर्निरोड येथील सैफी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची एक लहानशी शस्त्रक्रिया होणार असून त्यासाठी पुढील तीन ते चार दिवस महापौरांना रुग्णालयात ठेवले जाणार आहे. दरम्यान, महापौरांची कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Last Updated : Jun 29, 2020, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.