ETV Bharat / state

Kishori Pedekar on Ranibag Work : राणीबागेच्या कामात भ्रष्टाचार नाही, हे विरोधक कमी वैरी जास्त - महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील राणीबागेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. यावर राणीबागेत कामात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही, असा खुलासा महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar on Ranibag Work ) यांनी केला आहे. हे विरोधक कमी असून वैरी जास्त आहेत असा टोला लगावत मूळव्याधीसारखी यांची वृत्ती असेल तर ती आम्ही नीट करू शकत नाही, असे महापौर ( Kishori Pednekar Criticized Bjp ) म्हणाल्या.

Mumbai Mayor Kishori Pedekar
महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Jan 24, 2022, 4:44 PM IST

Updated : Jan 24, 2022, 5:32 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील राणीबागेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. यावर राणीबागेत कामात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही, असा खुलासा महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar on Ranibag Work ) यांनी केला आहे. हे विरोधक कमी असून वैरी जास्त आहेत असा टोला लगावत मूळव्याधीसारखी यांची वृत्ती असेल तर ती आम्ही नीट करू शकत नाही, असे महापौर ( Kishori Pednekar Criticized Bjp ) म्हणाल्या.

माध्यमांशी बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर

विरोधक कमी वैरी जास्त -

भाजपाकडून राणीबागेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी खुलासा केला आहे. यावेळी बोलताना विदेशी प्राण्यांसाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल अंतर्गत १० एकरच्या जागेत अधिवास आणि पर्यटकांना सुद्धा तिथे येता येईल यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. २०१८ चे शेड्युल रेट होते त्यानुसार आम्ही काम दिले होते. ९१.४२ कोटी, आणि ९४.२२ कोटीच्या शेड्युल रेट नुसार निविदा होती. भ्रष्टाचार झाला तर तो सिद्ध करून दाखवा. कोणतीही व्यक्ती असो, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. लोकशाहीमध्ये वाटेल ते आरोप करू नका. हे विरोधक कमी वैरी जास्त दिसतायेत असा टोला महापौरांनी दिला. तुम्ही परदेशातील कंपन्यांना आणा आणि या खर्चात हे प्रकल्प करून दाखवा असे खुले आव्हान भाजपाला महापौरांनी दिले.

हत्तीला चंपा तर चिंपाजीला चिवा नाव -

सध्या थेट आरोप करण्याच्या सुपाऱ्या घेतल्या जात आहेत. राणीबागेत विदेशी प्राणी पक्षी येणार आहेत. १०० रुपयात आम्ही राणीबाग दाखवणार आहोत. राणीबागेतील पेंग्विनचा वार्षिक खर्च ५ कोटी आहे तर पेंग्विन कक्ष तयार करण्यासाठी १७.५० कोटी आहे. गुजरातमध्ये पेंग्विन पार्क गुजरात सायन्स सोसायटीमध्ये सुरू केले. त्यासाठी २६४ कोटी खर्च झाले. तिथे लोकांच्या पशांचा विनयोग झाला का असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला. प्राणी आणि पक्षांची नावे इंग्रजीमध्ये देण्यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना उद्यानातील प्राण्यांना आता आम्ही शुध्द मराठी नाव देण्याचं ठरवलं आहे. हत्तीला चंपा तर चिंपाजीला चिवा नाव देणार आहोत. मूळव्यधी सारखी तुमची वृत्ती असेल तर ती आम्ही नीट करू शकत नाही असे सांगत जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत वीर जिजामाता भोसले उद्यान हे नाव कदापी बदलणार नाही, तसे कोणीही धाडस करू शकणार नाही असे महापौर म्हणाल्या.

हेही वाचा - Chandrakant Patil Criticized Shivsena : शिवसेनेने हिंदुत्व सोडले नाही हे त्यांनी काँग्रेसला ठणकावून सांगितले पाहिजे - चंद्रकांत पाटील

मी पण शिवसैनिक, मराठ्यांची औलाद -

शिवसेनेला एकट्या चित्रा वाघ पुरून उरतील असे वक्तव्य भाजपा नेत्यानाकडून केले जात आहे. यावर बोलताना शिवसैनिकच त्यांना पुरून उरेल. वाघ यांनी माझ्याबद्दल काही म्हटले आहे, नंतर त्यांना त्यांची चूक समजली. मी एक या देशातील महिला असून मुंबईची प्रथम नागरिक आहे. त्यामुळे महिलांचे किती हनन केले जातेय हे दिसून येतेय. सतत लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. मी चंद्रकांतदादा बद्दल बोलणार नव्हते. चंद्रकांत दादा जर बोलत असतील तर मी पण शिवसैनिक आहे मराठ्यांची औलाद आहे. माझ्यात पण एक मराठा लाख मराठा दौडतो याचे भान त्यांनी ठेवावे असा इशारा महापौरांनी दिला आहे.

पुढची पंचवीस वर्षे आरोप करायचा आहे -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलेल्या भाषणाला भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत बोलताना पक्षाच्या जन्माच्या आधी पक्षाच्यानंतर हे नवीन शोध मला माहीत नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हापासून या पक्षाचा ग्राफ चढता आहे. मराठीचा मुद्दा मराठी लोक तसेच इतर भाषिकही शिवसेनेला जॉईन करत आहेत. बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन या सगळ्यांचा विचार विनिमय झाल्यानंतर त्यातून मार्ग काढला जायचा. तेव्हा तुझा आणि माझा असं काही नव्हतं आता हे जरा जास्त व्हायला लागले आहे. शिवसेना कुठेही चार नंबर वर गेलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी काल त्याची व्याप्ती सांगितली. कमी जागांवर आम्ही जास्त ठिकाणी निवडून आलोय. जे नियोजन आम्ही केले होते त्यात आम्हाला यश आले आहे. विरोधकांना आरोप करायचा आहे, पुढची पंचवीस वर्षे हेच काम त्याना करायचं आहे. त्याला आपण काही करू शकत नाही, असा टोला महापौरांनी लगावला.

Last Updated : Jan 24, 2022, 5:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.