मुंबई - शहरातील वाढत्या कोरोना बाधितांची संख्या पाहता कोविड रुग्णांना बेड मिळावा, म्हणून मुंबई महापालिकेतर्फे योग्य पावलेही उचलली जात आहेत. गुढी पाडवा सण घरातच राहून लोकांनी साजरा करावा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना केले आहे. कोरोना रुग्णांसाठी प्रत्येक वॉर्डात 2 नोडल अधिकारी नेमणार असून, ते रुग्णांना बेडसाठी मदत करणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.
गुढी पाडवा घरी साजरा करा...
गुढी पाडव्यासोबत आंबेडकर जयंतीही आहे. मुंबईकरांनी घरीच राहून आनंदाने सण साजरा करा. बाबासाहेबांनी केलेली देशसेवा स्मरून आपणही घरी राहून देशसेवा करू, तेच खर अभिवादन ठरेल, असेही महापौर किशोरी पेडणेकरांनी सांगितले.
अग्निसुरक्षा सप्ताह यंदा होणार नाही...
काल आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काही मेडिकल दुकानांनी रुग्णाचे नातेवाईक असूनही औषध दिलं नाही. कोणीही औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. नरेंद्र मोदींचे आभार मानेन. कारण रेमडीसीवरची निर्यात थांबवली. देशात पहिली लस उपलब्ध करून दिली पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा - मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांचीही होणार बदली
हेही वाचा - कोरोना सेंटर सुरू करण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमधील बेड द्या, पालिका आयुक्तांची विनंती