पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री घेण्यात येणाऱ्या ब्लॉक कालावधीत, सर्व सीएसएमटी-गोरेगाव हार्बर मार्गावरील सेवा सीएसएमटी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान चालतील आणि वांद्रे येथून परत जातील. सीएसएमटी – सीएसएमटीहून 23.26 वाजता सुटणारी गोरेगाव सेवा 23.55 वाजता वांद्रेला पोहोचेल आणि 23.58 वाजता वांद्रेहून 00.01 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. सीएसएमटी – सीएसएमटीहून 23.46 वाजता सुटणारी गोरेगाव सेवा वांद्रे येथे 00.15 वाजता पोहोचेल आणि वांद्रेहून 00.32 वाजता परतेल आणि 01.02 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
गोखले ब्रीज - गोखले ब्रीज १९७५ मध्ये बांधण्यात आला. त्यानंतर पुलाचे ऑडिट केल्यानंतर धोकादायक जाहीर करण्यात आला होता. मात्र तांत्रिक कारणांमुळे पूल बंद करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ३ जुलै २०१८ रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पालिकेने एप्रिलपासून आपल्या हद्दीमधील गोखले पुलाचे नव्याने बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. हे काम ९० टक्के पूर्णही झाले आहे. मात्र रेल्वे हद्दीमधील धोकादायक झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे हा भागही पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ७ नोव्हेंबरपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मे २०२३ पर्यंत पुलाची एक लेन सुरू करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट्य आहे.
८४ कोटीचा खर्च - अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या पुलाचे बांधकाम वेगाने होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. पुलाच्या बांधकामासाठी ८४ कोटी ७२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
पूल पाडकामासाठी एवढी मोठी तयारी : मुंबई मध्य रेल्वेच्या मार्गावरील 20 नोव्हेंबर, 2022 रोजी तब्बल 27 तासांच्या जम्बो ब्लॉकला सुरुवात झाली होती. कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉकमुळे लोकलसह एक्स्प्रेस ट्रेनवर देखील परिणाम झाल्याचे नोंदविण्यात आले होते. यामुळे प्रवाशांना त्रासही सहन करावा लागत होता. मेगाब्लॉकमुळे अनेक लोकल गाड्या, एक्स्प्रेस गा्डया रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यास सुरुवात झाली होती.