हैदराबाद : भारतीय ग्राहकांमध्येही इलेक्ट्रिक कारची मागणी सातत्यानं वाढत आहे. याचं एक ताजं उदाहरण नुकतंच भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये दिसून आलंय. ऑटो एक्स्पो 2025 मध्ये, देशातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या 2 कार कंपन्यां, मारुती सुझुकी आणि ह्युंदाई यांनी त्यांच्या 2 नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीचं सादारीकरण केलंय. यामध्ये ह्युंदाई क्रेटा ईव्ही आणि मारुती सुझुकी विटारा यांचा समावेश आहे. दोन्ही एसयूव्ही एकदा चार्ज केल्यावर 450 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देण्याचा दावा करतात. या दोन्ही एसयूव्हीचे फिचर आणि किंमत जाणून घेऊया...
ह्युंदाई क्रेटा ईव्ही
ह्युंदाई इंडियानं क्रेटा इलेक्ट्रिक 7.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केली आहे. याच्या टॉप मॉडेलची किंमत 23.49 लाख रुपये आहे. Hyundai Creta EV मध्ये 42kWh आणि 51.4kWh चे 2 बॅटरी पॅक आहेत. त्यामुळं एकादा गाडी चार्ज केल्यावर 473 किलोमीटर धावते, असा कंपनीचा दावा आहे.
Maruti Suzuki e Vitara
Maruti Suzuki नं ऑटो एक्स्पो 2025 मध्ये त्यांची पहिली इलेक्ट्रिक SUV E Vitara प्रदर्शित केली. तुम्हाला Maruti Suzuki E Vitara मध्ये 49kWh आणि 61kWh बॅटरी पॅक मिळतील. ही कार एका चार्जवर 500 किलोमीटरपेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज देण्याचा दावा करते. Maruti Suzuki E Vitara ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 18 ते 19 लाख रुपये असू शकते, अशी शक्यता आहे. अधिकृत किंमत अजून जाहीर झालेली नाहीय.
कोण भारी? : E Vitara ड्रायव्हिंगच्या बाबतीत, Maruti Suzuki E Vitara Hyundai Creta EV पेक्षा चांगली ड्रायव्हिंग रेंज देत असल्याचं दिसतं. कंपनीनं बाजारात Maruti Suzuki E Vitara लाँच केलेली नाही. भारतीय बाजारात, Maruti Suzuki E Vitara आणि Hyundai Creta Electric टाटा कर्व्ह EV आणि MG ZS EV सारख्या इलेक्ट्रिक कारशी स्पर्धा करतील.
हे वाचलंत का :