ETV Bharat / state

Mumbai Local Mega Block Today: मुंबईच्या तीनही उपनगरीय रेल्वे मार्गावर जम्बो मेगाब्लॉक, जाणून घ्या रेल्वेचे आजचे सविस्तर वेळापत्रक - local time table today

रविवारी पुन्हा एकदा मुंबईकरांना रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. रेल्वेच्या तीनही उपनगरीय रेल्वे मार्गावर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेकडून मेल एक्सप्रेस गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने सुटणार आहेत.

Mumbai Local Mega Block Today:
मुंबई मेगा ब्लॉक
author img

By

Published : Jul 30, 2023, 10:03 AM IST

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी साडेदहा ते साडेतीन वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. तर मध्य रेल्वे मार्गावर सकाळी नऊ होते दुपारी एक वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वे मार्गावर मेल एक्सप्रेस गाड्या फास्ट लोकलच्या ट्रॅकवरून धावणार आहेत.

रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तीनही रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी जम्बो मेगाब्लॉक रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. उपनगरीय रेल्वे स्थानकांवर अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्ती कामासाठी जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना वेळापत्रक पाहूनच नियोजन करावे लागत आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून पश्चिम रेल्वेच्या मरीन लाईन्स आणि माहीम रेल्वे स्थानकाच्या दरम्यान सकाळी दहा वाजून 35 मिनिटे ते दुपारी तीन वाजून 35 मिनिटापर्यंत जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे चर्चगेट स्थानकांकडून विरार स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन या धीम्या मार्गावरून चालवल्या जाणार आहेत. तर मरीन लाईन आणि माहीम स्टेशनच्या दरम्यान जलद मार्गावरून धीम्या गतीने चालवल्या जाणार आहेत.

देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे मेगा ब्लॉक- पश्चिम रेल्वेवर महालक्ष्मी प्रभादेवी माटुंगा रोड येथे धीम्या लोकल थांबणार नाहीत. पश्चिम रेल्वेच्या या मेगाब्लॉकमुळे चर्चगेट स्थानकाकडून विरार स्थानकाकडे जाताना रेल्वेच्या अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे प्लॅटफॉर्मवर काम सुरू असल्यामुळे महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड या तीन रेल्वे स्थानकांवर धीम्या लोकलदेखील थांबणार नाहीत. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने लोअर परळ आणि माहीम जंक्शन येथे डबल हॉल्ट निश्चित केलेला आहे.

मध्य रेल्वेकडून सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत मेगा ब्लॉक- मध्य रेल्वेकडून सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत संपूर्ण जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. विशेष करून कल्याण मधील पाचवी आणि सहावी लाईन या ठिकाणी हा मेगाब्लॉक अधिकचा असणार आहे. तर मेल एक्सप्रेस गाड्या या फास्ट मार्गावर चालविल्या जाणार आहेत. त्यामुळे लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत. सर्व अप आणि डाउन मेल एक्सप्रेस अनुक्रमे अप फास्ट लाईन आणि डाउन फास्ट लाईनवर वळवण्यात येणार आहेत. निर्धारित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत.

मध्य रेल्वेवर या एक्स्प्रेस सुटणार

  • गाडी क्रमांक 11010 पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस
    • गाडी क्रमांक 17611 नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस
    • ट्रेन क्रमांक 12124 पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन
    • ट्रेन क्रमांक 12134 मंगळुरु-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
    • ट्रेन क्रमांक 13201 पाटणा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
    • ट्रेन क्रमांक 17221 काकीनाडा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
    • गाडी क्रमांक 12126 पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस
    • ट्रेन क्रमांक 22160 चेन्नई-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
    • ट्रेन क्रमांक 12168 बनारस-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस
    • ट्रेन क्रमांक 12321 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल
    • ट्रेन क्रमांक 12812 हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
    • ट्रेन क्रमांक 11014 कोईम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

    डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे वळण

    • ट्रेन क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कोल्हापूर एक्सप्रेस
    • ट्रेन क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस
    • ट्रेन क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर एक्सप्रेस
    • ट्रेन क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनथपुरम नेत्रावती एक्सप्रेस

    असे असणार आहे रेल्वेचे वेळापत्रक
  • वसई रोड येथून सकाळी ०९.५० वाजता दिवा साठी सुटणारी मेमू कोपर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
  • दिवा येथून सकाळी ११.३० वाजता वसई रोडला जाणारी मेमू दिवा ऐवजी कोपर येथून (शॉर्ट ओरीजनेट) सकाळी ११.४५ वाजता सुटेल.
  • पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत सुटणार आहेत.
  • •पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत.
  • पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत.
  • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावणार आहेत.
  • ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असणार आहेत.
    ब्लॉक कालावधीत बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावणार आहेत. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे तसेच हार्बर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचे या मेगाब्लॉकच्या निमित्ताने दिलगिरी व्यक्त केलेली आहे. प्रवाशांनी रेल्वेचे गाड्यांचे वेळापत्रक पाहून प्रवास करावा, अशी सूचना मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी आर के सिंग तसेच पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी केलेली आहे.

हेही वाचा-

  1. Mumbai Megablock News: अगोदरच पावसाने हाल बेहाल..भरीस भर म्हणजे आज रेल्वेचा मध्य, हार्बर मार्गावर 'मेघा'ब्लॉक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.