मुंबई : मध्य रेल्वेने दर रविवारचा मेगाब्लॉक दोन दिवस आधीच जाहीर केला ( megablock railway Sunday ) होता . मात्र नाशिक कडून मुंबईकडे रोज येणारी पंचवटी एक्सप्रेस यामध्ये तांत्रिक बिघाड झाला. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे येणाऱ्या मेल ,एक्सप्रेस आणि लोकल ट्रेन वाहतूक विस्कळीत झाली. लोकल 30 मिनिटे उशिरा धावत आहेत.
रेल्वेने रविवारचा मेगाब्लॉक जाहीर केल्यानंतर मुंबई आणि उपग्रहातील तसेच ठाणे ,कळवा, मुंबई, अंबरनाथ, बदलापूर कर्जत, कसारा येथील रेल्वे प्रवासी हे वेळापत्रक समोर ठेवून प्रवासाचे नियोजन करतात. मात्र मेगाब्लॉकच्या शिवाय उरली सुरली रेल्वे सेवा चालू असते. तिच्यावर देखील पंचवटी एक्सप्रेस मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे परिणाम झाला.
पंचवटी एक्सप्रेस सकाळी नाशिकवरून निघते आणि साडेदहाच्या सुमारास ठाण्याला पोहोचते. मात्र पंचवटी एक्सप्रेसच्या इंजिन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी कामगारांना तातडीने बोलवण्यात आले. परंतु यामुळे उरलीसुरली मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे याचा मनस्ताप मध्य रेल्वे वरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या प्रवाशांना झाला. यासंदर्भात रेल्वे प्रवासी अमोल कदम यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली की पंचवटी एक्सप्रेस या ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे त्याचा परिणाम उरल्या सुरल्या मध्ये रेल्वे वरील रविवारच्या वाहतूक सेवेवर झाला यामुळे वीस ते तीस मिनिटं लोकल ट्रेन उशिराने धावत आहे
पंचवटी एक्सप्रेसमध्ये बिघाड, सीएसएमडीकडे येणाऱ्या लोकलला उशिर - मुंबई लोकल सेवा
रविवारी मेगाब्लॉक असताना बहुतांश लोकल सेवेवर परिणाम ( Local railway services today ) आहेत. त्यात आणखी भर पडली आहे. पंचवटी एक्सप्रेसमध्ये बिघाड झाल्याने छत्रपती टर्मिनिसकडे येणाऱ्या लोकल उशिरा धावत आहेत.