मुंबई Mumbai Kidnapping News : कामाठीपुरा गल्ली नंबर 12 मध्ये घरात झोपलेल्या साडेपाच वर्षीय मुलीला पळून घेऊन जाणाऱ्या आरोपीला नागपाडा पोलिसांनी 6 तासांत अटक केलीय. आरोपीचं नाव रोतीन घोष (वय 35) असं आहे. 21 सप्टेंबरपर्यंत या आरोपीला न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी दिलीय.
चिमुकलीला आरोपीनं पळवून नेलं : 5 सप्टेंबरला सकाळी साडेसहा सात वाजताच्या सुमारास कामाठीपुरा गल्ली नंबर 12 मध्ये घरात झोपलेल्या पाच वर्ष सहा महिन्याच्या चिमुकलीला आरोपीनं पळवून नेलं होतं. अल्पवयीन मुलीचे वडील सकाळी सहा वाजता कामासाठी घरातून बाहेर पडले. त्यानंतर आई आणि तिचे दोन भाऊ घरात होते. मुलीचे वडील मिस्त्री काम करतात. पश्चिम बंगालहून हे कुटुंब गेल्या दोन वर्षांपासून कामाठीपुरा परिसरात राहतंय.
तक्रार दाखल केली : आरोपीचं तक्रारदार यांच्या घरी येणं जाणं होतं. तो मुलीला कधी कधी बाहेर फिरवण्यासाठी घेऊन जात असे. मात्र पाच सप्टेंबरला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घोषने चिमुकलीचं अपहरण केलं. त्यानंतर मुलीच्या आईने आरोपी घोषला संपर्क साधून मुलीला घेऊन येण्याची विनंती केली. मात्र, दुपार संध्याकाळ उलटून गेल्यानंतरही आरोपी घोष हा मुलीला घरी परत घेऊन आला नाही. त्यामुळं रात्री दीड दोनच्या सुमारास चिमुकलीच्या आईनं नागपाडा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल (Nagpada police rescued minor girl of Kamathipura) केलीय.
ब्लॅंकेटमध्ये अपहरण केलेली मुलगी : नागपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताबडतोब तपासाची चक्रे जलद गतीनं फिरवली. दरम्यान मुलीच्या आईनं दुपारी व्हिडिओ कॉल केला असताना आरोपीसोबत बोलतानाचा स्क्रीन शॉट काढला होता. त्या स्क्रीनशॉटच्या फोटोमध्ये आरोपीसोबत एका राखाडी कलरच्या ब्लॅंकेटमध्ये अपहरण केलेली मुलगी दिसत होती. हाच फोटो पोलिसांनी तपासासाठी सर्वत्र दिला. त्यानंतर आरोपी पश्चिम बंगालचा असल्याने तो पश्चिम बंगालला जाण्याची शक्यता होती. त्या अनुषंगाने जीआरपीची मदत घेऊन तात्काळ अमृतसर एक्सप्रेस आणि हावडा एक्सप्रेसची तपासणी केली. मात्र, आरोपी आणि अपहृत सापडली नाही. नंतर पोलीस पथकाने सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि एलटीटी कुर्ला रेल्वे स्थानक येथे पुढील चौकशी केली असता एलटीडी कुर्ला रेल्वे स्थानकातून शालिमार एक्सप्रेस निघाल्याची माहिती मिळाली. ही गाडी इगतपुरी येथील थांबण्याचा आणि आरोपीचे लोकेशन यामध्ये साधर्म्य होते. त्यावरून आरोपी मुलीला शालिमार एक्सप्रेसमधूनच घेऊन जात असल्याची खात्री पोलिसांना (Mumbai Kidnapping) पटली.
आरोपी जनरल डब्यात शौचालयात लपून बसला : पोलीस अधिकारी आणि पथकानं जीआरपीच्या मदतीनं चाळीसगाव, जळगाव येथे रेल्वेच्या जनरल डब्यांची तपासणी केली. मात्र मुलगी सापडली नाही. त्यानंतर पोलीस पथकानं शालिमार एक्सप्रेस आणि आरोपीचा तांत्रिक तपास केल्यावर बोधवड आणि बुलढाणा येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर शालिबार एक्सप्रेसचे पुढील थांबा असलेलं स्थानक तपासले असता, ते शेगाव असल्याचे कळाले. त्या अनुषंगाने शेगाव या रेल्वे स्थानकावर पोलिसांचे पथक गेले. रेल्वे पोलीस कंट्रोलची संपर्क साधून आरोपी आणि मुलीचा फोटो आणि माहिती जीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांना पाठवून तपास वेगाने सुरू करण्यात आला. शेगाव रेल्वे स्टेशनवर गाडी थांबल्यानंतर जनरल डब्यात तपासणी सुरू केली असता आरोपी हा जनरल डब्यात शौचालयात लपून बसलेला आढळून आला. जीआरपीएफच्या पोलिसांनी आरोपी आणि मुलीला ताब्यात घेऊन नागपाडा पोलिसांच्या स्वाधीन केलंय.
एकतर्फी प्रेमातूनच मुलीचं अपहरण : आरोपीचं अपहरण केलेल्या मुलीच्या आईवर एकतर्फी प्रेम होतं. तो तिला वारंवार स्वतः सोबत राहण्यासाठी आग्रह धरत होता. मुलीची आई त्यास नकार देत होती. त्यामुळं एकतर्फी प्रेमातूनच आरोपीनं मुलीचं अपहरण करण्याचं ठरवलं, अशी माहिती पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिलीय.
हेही वाचा :