मुंबई : मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ अर्थात म्हाडाने मुंबईतील पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि मध्य मुंबईत सुमारे 4083 घरांची सोडत काढली आहे. येत्या 18 जुलैला वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ही सोडत जाहीर करण्यात येणार आहे.
22 मे पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारणार : म्हाडाने या सोडतीसाठी 22 मे पासून अर्ज नोंदणी आणि ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. या सोडतीमध्ये सुमारे 4083 घरे असून अत्यल्प उत्पन्न गटासाठी 2790 घरे, अल्प उत्पन्न गटासाठी 1034 घरे, मध्यम उत्पन्न गटासाठी 149 तर उच्च उत्पन्न गटासाठी 120 घरे असणार आहेत.
संगणकीकृत सोडत होणार : यंदा म्हाडाने संगणकीकृत सोडत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या संगणकीकृत सोडतीसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये म्हाडाने काही बदल केले आहेत. त्यामुळे ही सोडत आता मानवी हस्तक्षेपाशिवाय पूर्ण होणार आहे. यासाठी आयएएस ही एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणाली वापरण्यात येणार असून त्यामध्ये 2.0 व्हर्जन आहे.
सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार : म्हाडाच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी तसेच नोंदणी करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी पात्रता निश्चिती, ऑनलाइन सोडत वितरण, घरांच्या रकमेचा भरणा अशा सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. त्यासह अँड्रॉइड मोबाइल आणि प्ले स्टोअर, अॅपल मोबाइल, अॅप स्टोअरमध्ये मोबाइल अॅप्लिकेशन उपलब्ध केली गेली आहेत.
कोणाला होता येणार सहभागी? : म्हाडा लॉटरी योजनेत सहभागी होण्यासाठी काही पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
- Sameer Wankhede News: समीर वानखेडेंना दिलासा; अटकेपासून संरक्षण कायम, मात्र कोणतीही माहिती माध्यमांना न देण्याची तंबी
- Ration Card Holders: राज्यात रेशनिंग दुकानावर जनता त्रस्त, तर सरकार मस्त; नाव नोंदणीसाठी मागितले जातात बेकायदेशीरपणे पैसे
- University Vice Chancellor: गुन्हे दाखल असलेले व्यक्ती कुलगुरू पदाचे उमेदवार म्हणून कसे निवडले? मुंबई विद्यापीठ कॉलेज टीचर असोसिएशनचे राज्यपालांना पत्र