मुंबई - चांदिवाल आयोगाच्या कारभाराविरोधात दाखल केलेली याचिका ( Sachin Waze Petition against Chandiwal Commission ) बिनशर्त मागे घ्या अन्यथा कठोरपणे ती फेटाळून लावू, अशी तंबी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला ( Mumbai High Court to Sachin Waze's lawyer ) मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. तसेच याप्रकरणी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत निर्णय कळवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. आयोगाला दिलेले चार अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात वाझेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र, योग्य माहिती लपवत असल्याबद्दल खंडपीठानं वाझेच्या वकिलांना झापले. यावरुन न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत.
रियाज काझीचा जवाबसुद्धा आयोगाने रेकॉर्डवर घेण्यात यावा -
सचिन वाझे यांनी चांदीवाल आयोगासमोर दिलेल्या चार अर्ज आयोगाने फेटाळल्यानंतर सचिन वाझेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. वाझेने त्याच्या अर्जात म्हटले आहे, की मिलिंद भारंबे यांचे स्टेटमेंट आयोगाने रेकॉर्डवर घेण्याकरिता अर्ज दाखल केला होता. मात्र, तो अर्ज आयोगाने फेटाळून लावला. तसेच रियाज काझीचा जवाबसुद्धा आयोगाने रेकॉर्डवर घेण्यात यावा, अशी मागणी केली होती. तीदेखील आयोगाने फेटाळली होती. त्यानंतर वाझेने अनिल देशमुख यांच्यासंदर्भात आणखी काही माहिती आयोगाला सांगायची आहे त्यासंदर्भात केलेला अर्ज देखील आयोगाने फेटाळला होता.
तसेच मी दिलेले जवाब मधील काही मुद्द्यांवर मला पुन्हा जवाब नोंदवायचा आहे तसा अर्ज मी आयोगाला दिला होता. मात्र, आयोगाने तोदेखील फेटाळून लावल्याने अखेर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, तिथेदेखील वाझे यांनी त्यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या चार प्रतिज्ञापत्रमध्ये माहिती लपल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने वाझे यांच्या वकिलांना फटकारले आहे. दाखल केलेली याचिका बिनशर्त मागे घ्या अन्यथा कठोरपणे ती फेटाळून लावू, अशी तंबी दिली.
हेही वाचा - राज्यपालांनी त्या वक्तव्यावरून माफी मागण्याची आवश्यकता नाही- रामदास आठवले