ETV Bharat / state

राजीव गांधी हत्याकांडातील दोषी पेरारीवालन आणि संजय दत्तच्या प्रकरणात न्यायालयाने तपशील मागविला

author img

By

Published : Feb 20, 2021, 4:48 PM IST

राजीव गांधी हत्येप्रकरणी दोषी असलेले एजी पेरारीवलन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य माहिती आयोगाला (एसआयसी) नोटीस बजावली आहे. न्यायालयाने बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या बॉलीवूड अभिनेता संजय दत्तच्या लवकर सुटकेबाबतही तपशील मागवला आहे.

Mumbai High Court Issues Notice
Mumbai High Court Issues Notice

मुंबई - राजीव गांधी हत्येप्रकरणी दोषी असलेले एजी पेरारीवलन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य माहिती आयोगाला (एसआयसी) नोटीस बजावली आहे. न्यायालयाने बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या बॉलीवूड अभिनेता संजय दत्तच्या लवकर सुटकेबाबतही तपशील मागवला आहे.

मुंबई

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचे माफी देण्याबाबतचे मत आणि पेरारीवलनच्या सुटकेबाबत सर्वोच्च न्यायालयात माहिती देताना गृह मंत्रालयाच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती के. आर. चगला यांच्या न्यायमूर्ती पी. तातेड यांच्या खंडपीठाने पेरारीवलनच्या वकिलांना सादर करायला सांगितले. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येस जबाबदार असलेल्यांना बॉम्ब बनविण्यास मदत केल्याबद्दल पेरारीवलनला वयाच्या 19 व्या वर्षी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सध्या तो चेन्नईच्या पुझल मध्यवर्ती कारागृहात आहे.

याचिकेत काय म्हटले आहे

याचिकेत म्हटले आहे की, मार्च 2016 मध्ये येरवडा कारागृह अधिकाऱ्यांकडून माहिती अधिकार (आरटीआय) अर्जाद्वारे दत्त यांची माहिती मागितली गेली होती. दत्तला लवकर माफी देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी केंद्र व राज्य सरकारचे मत घेतले गेले होते का? हे जाणून घेण्याची विनंती केली होती. पेरारीवलन, तुरुंग तसेच अन्य संबंधित प्राधिकारणांकडून काही उत्तर न मिळाल्यानंतर त्यांनी एसआयसीसमोर अपील दाखल केले, परंतु अखेरीस उच्च न्यायालयात जाण्यास भाग पडले.

उच्च न्यायालयात वकील निलेश उके यांच्यामार्फत त्यांची याचिका एसआयसी आणि येरवडा कारागृह अधिकाऱ्यांसंबंधित माहिती मागण्यासाठी निर्देश दाखल केले होते. शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी असलेल्या दत्तला 6 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली असून ती कमी करून 5 वर्षे करण्यात आली आहे. त्याला वेगवेगळ्या प्रसंगी फरलो आणि पॅरोलवर सोडण्याची परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर त्याला माफी देण्यात आली. दत्तला शस्त्र कायद्यांतर्गत विशेष न्यायालयाने सहा वर्षांपर्यंत दोषी ठरविले. नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्या निर्णयाला कायम ठेवले. तथापि, शिक्षा कमी करून पाच वर्षे करण्यात आली. 2013 मध्ये शिक्षा भोगण्यासाठी तो येरवडा कारागृहात गेला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.