ETV Bharat / state

सुशांतसिंह राजपूत हा सरळ व साधा व्यक्ती होता - उच्च न्यायालय

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेत त्याच्या वांद्रे येथील घरी (दि. 14 जून) आत्महत्या केली होती. त्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला होता. या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू असून ईडीने देखील या प्रकरणाचा तपास केला. उच्च न्यायालयात याबाबत घटला सुरू आहे.

Sushant Singh Rajput
सुशांतसिंह राजपूत
author img

By

Published : Jan 8, 2021, 11:33 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने वक्तव्य करत, सुशांत हा सरळ व साधा व्यक्ती होता, असे म्हटले आहे. भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित 'एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी'मध्ये सुशांतने अभिनय केला होता. त्याच्या चेहऱ्यावरून तो साधा व सरळ माणूस असल्याचे दिसून येते, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

गुन्हा रद्द करण्यासाठी सुशांतच्या बहिणींची कोर्टात धाव -

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याची प्रियसी रिया चक्रवर्तीने बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. सुशांतच्या बहिणी मितू सिंह व प्रियांका सिंह यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला होता. याबरोबरच दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरुण कुमार यांचाही या गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र, मीतू सिंह व प्रियांका सिंह यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

टेलिमिडीसीनद्वारे सुशांतला कन्सल्ट केल्याचा दावा -

सुशांतसिंह राजपूत हा डिप्रेशनमध्ये होता. त्यावेळी दिल्लीतील हृदय विकार तज्ञ डॉक्टर तरुणकुमार यांच्याकडून माहिती घेत सुशांतच्या बहिणी मीतू सिंह व प्रियांका सिंह या दोघींनी सुशांतला बंदी असलेली औषधे घेण्यास भाग पाडले. असा आरोप रिया चक्रवर्तीने 7 सप्टेंबर 2020ला केला होता. यासंदर्भात वांद्रा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर सुशांतच्या बहिणींकडून दावा करण्यात आला होता की, टेलीमेडिसीन प्रॅक्टिस गाईडलाईन्सच्या आधारावर डॉक्टरांनी सुशांतला ऑनलाइन कन्सल्टकरून औषध घेण्यास सांगितली होती.

मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा कायद्याच्या चौकटीत

या प्रकरणामध्ये कुठलेही ऑनलाइन मेडिकल कन्सल्टेशन झालेले नव्हते. सुशांतसिंह राजपूत व त्याच्या बहिणींमध्ये 8 जून 2020ला व्हॉट्सअ‌ॅप चॅटमधून औषधांबाबत बोलणे झाले होते. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हा कायद्याच्या चौकटीत आहे. नियमानुसार हा गुन्हा पुढील तपासासाठी सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांचे वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयात दिली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भातील आपला निर्णय राखून ठेवलेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.