ETV Bharat / state

Aryan Khan Drug Case : दिलासा नाहीच, उद्या पुन्हा उच्च न्यायालयात होणार सुनावणी

मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने पुढची तारीख दिली आहे. त्यामुळे आर्यन खानसह इतर आरोपींना आजची रात्रही तुरुंगातच काढावी लागणार आहे.

आर्यन खान
आर्यन खान
author img

By

Published : Oct 27, 2021, 6:59 PM IST

Updated : Oct 27, 2021, 8:31 PM IST

मुंबई - मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने पुढची तारीख दिली आहे. त्यामुळे आर्यन खानसह इतर आरोपींना आजची रात्रही तुरुंगातच काढावी लागणार आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी अरबाज मर्चंटसाठी ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तीवाद केला. माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू मांडली. मात्र, या युक्तीवादाला अधिक वेळ लागल्याने न्यायालयाने जामीनावर गुरुवारी (दि. 28) पुन्हा सुनावणीचा निर्णय घेतला.

बोलताना अॅड. काशिफ खान देशमुख

जामीन अर्जावर आजही सुनावणी अपूर्ण

आरोपी आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर त्यांच्या जामीन अर्जांवर युक्तिवाद पूर्ण केला. एनसीबीचे एएसजी अनिल सिंग उद्या या युक्तिवादाला उत्तर देतील. त्यामुळे उद्या (28) दुपारी 3 वाजता या तिघांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे, अशी माहिती मुनमुन धामेचाचे वकील काशिफ खान देशमुख यांनी दिली.

सध्या अटक करणे नियम व जामीन अपवाद झाला

जामीन मिळणे हा कायदा आणि नियम आहे, तर तुरूंग हा अपवाद आहे. मात्र, सध्या अटक करणे नियम आणि जामीन अपवाद झाला. या प्रकरणात कोणतेही षडयंत्र नव्हते. ही केवळ व्यक्तीगत कृती असताना अटकेची काय गरज होती..? दुपारी दोन वाजता त्यांना अटक करण्यात आली आणि रात्री 7 वाजता त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. कोठडी मागतानाही षडयंत्र असल्याचा काहीही उल्लेख नव्हता. नंतर हे 8 लोकांचे षडयंत्र असल्याचा दावा करण्यात आला आणि आता 20 लोकांचे षडयंत्र असल्याचा दावा केला जातोय, असेही अमित देसाई यांनी सांगितले.

ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप होता, मग वैद्यकीय चाचणी का केली नाही..?

न्यायालयाने एनसीबीच्या मागणीनुसार आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी दिली. मात्र, आजपर्यंत षडयंत्र केल्याप्रकरणी एकालाही अटक करण्यात आलेली नाही. षडयंत्र हा एक स्वतंत्र गुन्हा आहे. पंचनाम्यातही हे प्रकरण केवळ व्यक्तीगत ड्रग्ज सेवनाचा उल्लेख असल्याचे म्हटले आहे. संशयीतांवर ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप होता. तर त्यांची वैद्यकीय चाचणी का केली नाही, असा सवाल वकिलांनी न्यायालयात उपस्थित केला.

मुकूल रोहतगींनी दिला मधू लिमये खटल्याचा दाखला

रोहतगी म्हणाले, अटक वॉरंटमध्ये अटकेसाठी खरे आणि योग्य कारण दिलेले नाही. यामध्ये कलम 50 सीआरपीसीचा संदर्भ देण्यात आला आहे. घटनेचे कलम 22 हे सीआरपीसच्या कलम 50 पेक्षा अधिक प्रभावी आहे. त्यात असे नमूद केले आहे की, अटकेच्या कारणाविषयी माहिती दिल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करू नये आणि व्यक्तीला त्याच्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा अधिकार असेल. यासाठी रोहतगी यांनी मधु लिमये प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भही दिला.

आढावा घेताना प्रतिनिधी

इलेक्ट्रॉनिक पुराव्यांसाठी 65 ब प्रमाणपत्राची आवश्यकता आहे का..? - न्यायालय

यूकेने इलेक्ट्रॉनिक पुराव्यासाठी कलम 65 ब प्रमाणपत्राची आवश्यकता रद्द केली आहे, असा सवाल न्यायमूर्ती सांबरे यांनी उपस्थित केला. यावर देसाई म्हणाले, यूके पुन्हा जुन्या पद्धतीचा वापर करत आहे. कलम 65 बी प्रमाणपत्राशिवाय व्हॉट्सअॅप चॅट्स स्वीकारता येतात. डिजिटल पुराव्याची पडताळणी करावी लागेल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एनडीपीएस प्रकरणात तसे म्हटल्याचेही यावेळी देसाई यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

आतापर्यंत नेमकं काय झालं..?

दोन ऑक्टोबरला एनसीबीने मुंबईत कॉर्टेलिया क्रूझवर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान, एनसीबीने एकूण 8 लोकांना अटक केली. अटकेची कारवाई झाल्यापासून हे सर्वजण तुरुंगातच असून त्यांच्या जामीन याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये यासंदर्भात सुनावणी सुरू असताना मंगळवारी (26 ऑक्टोबर) दोघांचा जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच जामीन मिळाला.

यापूर्वी एनडीपीएस न्यायालयाने फेटाळला होता जामिन अर्ज

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली. त्यांच्या अर्जावर आज (27 ऑक्टोबर) सुनावणी झाली. दुसरीकडे एनडीपीएस न्यायालयातही या प्रकरणातील इतर संशयीतांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे.

मुनमुनकडे काहीही सापडले नाही - अॅड. काशिफ खान देशमुख

अॅड. काशिफ खान मुनमुन धमेचाच्या वतीने म्हणाले, मुनमुन एक फॅशन मॉडेल असून ती स्टेज शो आणि रॅम्प वॉक करते. तिला एका व्यक्तीने व्यावसायिक कामासाठी क्रूझवर निमंत्रित केले होते. मुनमुनकडे काहीही सापडलेले नाही जे सापडले, ते सौम्या सिंगकडे सापडले आहे. मात्र, मुनमुनला या प्रकरणात अटक करण्यात आली. मात्र, सौम्या कुठे आहे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा - Aryan Khan Drug Case LIVE : आजची रात्र कारागृहातच, कोर्टाचे कामकाज संपल्याने सुनावणी उद्यावर

Last Updated : Oct 27, 2021, 8:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.