ETV Bharat / state

आमदार नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा : पुढील सुनावणी 7 जानेवारीला

संतोष परब हल्ला प्रकरणात ( Santosh Parab Halla Case )आज आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) नितेश राणे यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. तसेच पुढील सुनावणी पर्यंत नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) यांना अटक करू नये असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.

MLA Nitesh Rane
आमदार नितेश राणे
author img

By

Published : Jan 4, 2022, 12:50 PM IST

मुंबई : आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) सुनावणी करण्यात आली. त्यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. त्यावेळी नितेश राणे यांचे वकील नितीन प्रधान यांनी नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन देण्यात यावा, याकरिता कोर्टासमोर अनेक मुद्दे उपस्थित केले. तर दुसरीकडे सरकारी वकील यांनी संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यात नितेश राणे हेच प्रमुख असल्याचे न्यायालयासमोर सांगितले.

या संदर्भात पोलिसांकडे या सर्व प्रकरणाचे पुरावे देखील आहेत. तसेच हे सर्व पुरावे कोर्टासमोर सादर करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. या प्रकरणात प्रतिज्ञापत्र देखील सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान सांगितले आहे. तसेच तोपर्यंत नितेश राणेंना ( ( MLA Nitesh Rane ) अटक करण्यात येणार नसल्याची ग्वाही कोर्टाला दिली आहे. त्यामुळे नितेश यांना तूर्तास अटक होणार नाही. आता त्यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

पुढील सुनावणी 7 जानेवारीला होणार -

त्यानंतर कोर्टाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्रं सादर करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर शुक्रवार दिनांक 7 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी दोन्ही बाजूचे वकील काय युक्तीवाद करतात, आणि नितेश राणेंना जामीन मिळतो का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण?

संतोष परब हल्ला प्रकरण ( Santosh Parab Halla Case ) आहे. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय आहेत. तसेच ते करंजे गावचे माजी सरपंच आहेत. कणकवलीत संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबरला हल्ला झाला होता. परबांवर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला दिल्लीतून सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी ( Sindhudurg Rural Police) अटक केली आहे. तसेच सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे.

सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध शिवसेना -

कोकणामध्ये राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. हा संघर्ष पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. तर राणे विरुद्ध शिवसेना असा सामना या निवडणुकीमध्ये रंगला होता. मात्र, या निवडणुकीत अखेर राणे यांना मोठे यश मिळाले. राणे गटाच्या 11 जागा निवडून आल्या आहे. तसेच शिवसेनेचे हातात असलेली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक आता नारायण राणे यांच्या गटाकडे आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोकणामध्ये पुन्हा नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा - Nitesh Rane rushed for bail : नितेश राणे यांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.