मुंबई: 2006 या कालावधीमध्ये वाढदिवस असताना मिका सिंग आणि राखी सावंत हे आमने-सामने आले होते. त्यावेळेला इतर सीने अभिनेते आणि सिने अभिनेत्री देखील उपस्थित होत्या. तेव्हा मिका सिंग याने आपल्या मनाविरुद्ध आपले चुंबन घेतले म्हणून राखी सावंतने त्याच वेळेला सर्वांसमोर मिका सिंगला दोन शब्द सुनावले. त्यानंतर राखीने संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
काय आहे मिका सिंगचे मत: पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असल्यामुळे त्या अनुषंगाने मिका सिंग याने ते दाखल झालेला प्रथम खबरी अहवाल हा रद्द व्हावा यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपली याचिका दाखल करत धाव घेतलेली आहे. या याचिकेमध्ये मिका सिंग याने अधोरेखित केलेले आहे की, 2006 मधील ही घटना आहे. त्यामुळे आता ही दाखल एफआयआर आता रद्द व्हायला हवी आणि म्हणूनच त्यासाठीचा अर्ज न्यायालयापुढे सादर करीत आहे.
राखीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश: मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती पी डी नाईक यांच्या खंडपीठांसमोर मिका सिंग याने दाखल केलेली याचिका आज सुनावणी करिता आली. त्यावेळेला मिका सिंग यांच्या वकिलांची बाजू ऐकून घेऊन आता राखी सावंत हिला पुढील सुनावणी पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहे.
राखीचे लग्न वादात: अभिनेत्री राखी सावंतचे लग्न वादात सापडले आहे. त्याचवेळी राखीने पती आदिल खान दुर्राणीवर चोरी आणि फसवणूक केल्याचा आरोपही केला आहे. या प्रकरणी राखी सावंत म्हैसूर कोर्टात पोहोचली.
राखी सावंत भावूक : बॉलीवूड अभिनेत्री राखी सावंत पती आदिलविरुद्धच्या खटल्यासंदर्भात आज म्हैसूर न्यायालयात पोहोचली आहे. म्हैसूर येथील न्यायालयासमोर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नुकतेच निधन झालेल्या आईची आठवण करून अभिनेत्री राखी सावंत भावूक झाल्याची पहायला मिळाली. पती आदिल खान दुर्रानीवर फसवणुकीचा आरोप केल्यानंतर राखी सावंतला अश्रू अनावर झाले. माध्यमांसमोर तिने त्यांच्या भावनांना वाट करून दिली.
पोलीस कोठडी : राखी सावंत हिने अलीकडेच आदिल खान दुर्राणीविरुद्ध मुंबईत फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. मुंबई पोलिसांनी आरोपीला यापूर्वीच अटक केली होती. दरम्यान, म्हैसूरमधील व्हीव्ही पुरम पोलीस स्टेशनमध्ये एका इराणी विद्यार्थ्यीनीने पोलिसांकडे तक्रार केली की, आदिल खान दुर्राणीने लग्नाचे आमिष दाखवून आपली फसवणूक केली. दरम्यान, मुंबईत अटक करण्यात आलेल्या आदिलला म्हैसूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आदिलला 23 फेब्रुवारी, 2023 रोजी म्हैसूर येथे आणून न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आदिलला २७ फेब्रुवारीपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
हेही वाचा: Devendra Fadnavis : माझी आई जिथे शिकली ती जागा माझ्यासाठी पवित्र - देवेंद्र फडणवीस