मुंबई: मिरारोड मधील जेपी इन्फ्रा या उच्चभ्रू इमारतीमध्ये दोन बकऱ्या आणल्यामुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये मंगळवारी मध्यरात्री राडा झाला. बकरी ईदच्या कुर्बानीसाठी सोसायटीमधील एका व्यक्तीने दोन बकरे आणले होते. परंतु त्याला तेथील रहिवाशांनी विरोध केला. त्याचा विरोध करताना त्याची गाडी सोसायटीच्या गेटवर थांबवण्यात आली होती. यावेळी बकऱ्या घरी आणणाऱ्या महिलेच्या गैरवर्तन रहिवाशांकडून झाल्याचे सांगण्यात येत आहे.
रहिवाशांवर विनयभंगाचा गुन्हा : सोसायटीमधील रहिवाशी असलेल्या एका व्यक्तीने दोन बोकड आणली होती. याची माहिती सोसायटीमधील इतर रहिवाशांना झाली, तेव्हा त्यांना त्याव्यक्तीला जाब विचारला. त्यावेळी त्यांच्या मोठा वाद झाला. याच वादावेळी त्या व्यक्तीच्या महिलेशी गैरवर्तन झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी त्या व्यक्तीच्या पत्नीने काशीमिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीनुसार सोसायटीतील ३० ते ४० सदस्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती संदीप कदम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली.
गुन्हा दाखल : मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास एक रहिवाशी आपल्या कुटुंबासोबत कॉम्प्लेक्समध्ये येत होता. त्यावेळी या सोसायटीच्या गेटवरती सुरक्षारक्षकांनी त्यांची गाडी थांबवली आणि तपासणी केली. त्यावर मोहसीन यांनी विरोध केला. त्यानंतर सोसायटीचे सर्व रहिवाशी खाली उतरले. त्यानंतर इतर रहिवाशी आणि त्या व्यक्तीमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याठिकाणी सोसायटीमधील तब्बल २०० पेक्षा अधिक सदस्य जमले होते. त्यानंतर मोहसीन यांनी पोलिसांना कंट्रोलवर माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. ते रहिवाशी व त्यांच्या पत्नीला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. रहिवाशाच्या पत्नीच्या तक्रारीवरून कलम १४३,१४७,१४९,३५४,३२३,३४१,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास काशिमिरा पोलीस करत आहेत.
काय आहे प्रकरण : हाती आलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने ईदीच्या कुर्बानीसीठी दोन बोकड आणले होते. याची माहिती सोसायटीमधील इतर लोकांना झाली. त्यानंतर त्यांनी इमारतीच्या खाली येत आंदोलनाला सुरुवात केली. या सोसायटीमध्ये कुर्बानीसाठी बकरे आणण्यास मनाई असल्याचे तेथील इतर रहिवाशांनी सांगितले. परंतु त्या व्यक्तीने दमदाटी करत बोकड आणली. त्या व्यक्ती आणि रहिवाशांमध्ये जोराचा वाद झाला त्यावेळी त्यांनी दोन्ही गटातील व्यक्तींना बोलवले. यामुळे बकऱ्याचा विरोध करणाऱ्या लोकांनी श्रीरामाचे नारे दिले.
पोलिसांना पाचारण : सोसायटीमधील लोक बोकड आणला म्हणून विरोध करू लागले होते.त्यानंतर दोन गटात वाद होऊ लागला. सोसायटीमधील काही मु्स्लीम लोकांनी आपल्या समुदायातील लोकांना बोलवले. त्यानंर हिंदू धर्माच्या लोकांना बजरंग दलाच्या लोकांना बोलवले. हळूहळू शकडो लोका सोसायटीच्या परिसरात जमा झाले आणि वाद वाढू लागला. परिसरात वाद वाढत असल्याचे दिसताच काहींनी बोलवले. पोलिसांनी कुर्बानीचा विरोध करणाऱया लोकांची समजूत काढत त्यांना शांत केले. परंतु मीरा भाईंदर परिसरात काहीसे तणावाचे वातावरण आहे. कुर्बानीसाठी जनावरे सोसायटीत आणण्याची परवानगी आहे का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
हेही वाचा -