मुंबई Mumbai Gang Rape News: 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी गुंगीचं औषध देऊन सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय. ही खळबळजनक घटना मुलुंड परिसरात घडली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज एका आरोपीला मुलुंडमधून अटक करण्यात आलीय. आरोपीचं नाव निलेश पुवन हरिजन असं आहे. आणखी एक आरोपी वॉन्टेड असल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथमीरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिलीय.
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक परराज्यात : एका आरोपीच्या मुसक्या मुलुंडमधूनच आवळल्या आहेत. दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक परराज्यात गेलं आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय. अटक केलेल्या आरोपीचं नाव निलेश पुवन हरिजन असं आहे. फरार आरोपीचे नाव नटराजन हरिजन असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय.
अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार : मुलुंड येथे सामूहिक बलात्काराचा संतापजनक प्रकार समोर आलाय. 16 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. चाकूचा धाक दाखवून तसंच आईला जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेमुळं मुलुंडमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलीय. अन्य आरोपींचा पोलीस अधिक तपास करत आहे.
पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा : पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधान संहिता कलम आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नुकतेच जोगेश्वरीमध्ये देखील आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा मुलुंडमध्ये ही घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अन्य एका आरोपीच्या शोधात मुलुंड पोलिसांचे पथक परराज्यात रवाना झालेय.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार : मुलुंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड येथे हा धक्कादायक प्रकार घडलाय. 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. चाकूचा धाक दाखवून त्याचप्रमाणे आईला जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. मुलुंड पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी निलेश नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या आरोपीच्या शोधात पोलिसांचे पथक परराज्यात रवाना झाले आहे. गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं दाखल गुन्ह्यात नमूद करण्यात आलंय. या प्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या दिशेनं तपास सुरू केला असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
हेही वाचा :