ETV Bharat / state

Mumbai Drowning News: मालाड मार्वेनजीकच्या समुद्रात बुडालेल्या 'त्या' तीन मुलांचे मृतदेह सापडले, बचाव पथकाचे प्रयत्न ठरले निष्फळ

मालाड मार्वे बीचवर पोहायला गेलेले पाच मुले समुद्रात बुडाल्याची घटना रविवारी सकाळी घडली होती. यातील दोन मुलांना वाचविण्यात यश आले होते. बुडालेल्या तीन मुलांचे मृतदेह आज सापडले आहेत. मालवणी पोलीस आणि मुंबई महानगरपालिकाचे लाईफ गार्ड आणि अग्निशामक दलाचे जवान यांनी समुद्रात सर्च ऑपरेशन केले होते.

Mumbai Drowning News
मुलांचे मृतदेह सापडले
author img

By

Published : Jul 17, 2023, 2:07 PM IST

मुंबई : वांद्रे येथे एक महिला समुद्राच्या पाण्यात बुडाल्याची घटना ताजी असताना मालाडच्या मार्वे बीचवर मुले समुद्रात बुडाल्याची घटना घडली होती. मालवणी भागातील परेरा वाडी येथील रहिवासी असलेल्या 12 ते 16 वयोगटातील पाच मुले रविवारी सकाळी नऊ वाजता मालाड उपनगरातील मार्वे बीचवर पोहण्यासाठी गेले होते. समुद्राची खोली लक्षात न आल्यामुळे हे मुले समुद्रात बुडाले होते. मुंबईतील मार्वे बीचवर बुडालेल्या तीनही अल्पवयीन मुलांचे मृतदेह सोमवारी सापडले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

औपचारिकतेनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात : अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस, तटरक्षक दल आणि नौदलाच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली होती. ती शोध मोहिम रविवारी रात्री थांबवण्यात आली होती. या शोध मोहिमेत हेलिकॉप्टरचाही सहभाग होता, तो संध्याकाळी मागे घेण्यात आला. बेपत्ता झालेल्या तीन मुलांचे मृतदेह शोधण्यात आज यश आले आहे. हे मुले वयोगटातील 12 ते 14 वयोगटातील होते. या मुलांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत, असे मालवणी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले. योग्य औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मुलांचा बुडून मृत्यु : मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा जितेंद्र हरिजन ( वय 16) आणि अंकुश भारत शिवरे (वय 13 वर्ष) या मुलांना वाचविण्यात यश आले होते. परंतु शुभम राजकुमार जयस्वाल (वय 12 वर्ष), निखील साजिद कायमकूर (वय 13 वर्ष), अजय जितेंद्र हरिजन (वय 12 वर्ष) या मुलांचा बुडून मृत्यु झाला आहे. चंद्रपूरमध्ये देखील अशीच घटना घडली होती. पिकनिकसाठी गेलेली चार मुले सेल्फी काढण्याच्या नादात घोडाझेरी तलावात पडले होते. ही घटना रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहिम सुरू करण्यात आली होती.

हेही वाचा :

  1. Drowning Death News: मुंबई आणि चंद्रपूर येथे सात मुले बुडाली, तीन मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याचा संशय
  2. Mumbai Drowning News : मालाड मार्वे बीचवर पोहायला गेलेले ५ मुले बुडाली; दोघांची सुटका, तिघांचा शोध सुरू
  3. Children Rescued In Mumbai Sea: समुद्रात बुडणाऱ्या दोन मुलांची मुंबई पोलिसांनी केली सुखरूप सुटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.