ETV Bharat / state

Mumbai Double Decker Bus : मुंबई दर्शन घडवणाऱ्या ओपन 'डबल डेकर'ची आज अखेरची सफर - डबल डेकर बस

Mumbai Double Decker Bus : मुंबईकरांसाठी नेहमीच आकर्षण ठरलेली आणि मुंबई दर्शन घडवणारी शेवटची ओपन डेक बस आज धावणार आहे. बेस्ट उपक्रमानं २६ जानेवारी १९९७ रोजी ओपन डबल डेकर बस सुरु केली होती.

Mumbai Double Decker Bus
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2023, 11:05 AM IST

मुंबई Mumbai Double Decker Bus : मुंबई दर्शनासाठी पर्यटकांचं आणि मुंबईकरांचं आकर्षण असलेल्या बेस्टच्या ओपन डबल डेकर बसची आज शेवटची सफर असणार आहे. या गाड्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं त्या आता वाहतुकीतून बंद करण्याचा निर्णय वाहतूक नियमानुसार पालिकेनं घेतलाय. या गाड्यांच्या जागी आता नवीन 10 ओपन डबल डेकर बस दाखल होतील, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आलीय. बेस्टच्या ताब्यात असलेल्या जुन्या ओपन डबल डेकर बस गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबईकरांना अविरतपणे आपली सेवा देत आहेत. अखेर या बसचा कार्यकाळ संपल्यानं या गाड्यांना आता निवृत्ती देण्यात आलीय.

दर महिन्याला 20 हजार पर्यटक घेत होते मुंबई दर्शन : बेस्ट प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी 1997 ला एमटीडीसीच्या सहकार्यानं बेस्टनं ओपन डबल डेकर बस प्रवाशांच्या सेवेत आणल्या. यात ओपन अप्पर डेक आणि लोअर डेक असे प्रकार आहेत. या बसनं प्रवासी व पर्यटकांनी मुंबई दर्शनाचा पुरेपूर आनंद आतापर्यंत लुटलाय. पूर्वी ओपन डेक बसमधून पश्चिम उपनगरातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यात येत होत्या. नंतर 3 नोव्हेंबर 2021 पासून दक्षिण मुंबईमध्ये पर्यटकांसाठी ओपन पर्यटन सेवेचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी आणि दुपारी सुरू असलेल्या या सेवेच्या वेळेत वाढलेल्या उन्हामुळं वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. त्यानंतर या बसच्या फेऱ्या संध्याकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ पर्यंत होऊ लागल्या. या बसमधून दर महिन्याला अंदाजे वीस हजार पर्यटक मुंबई दर्शनाचा आनंद घेत होते.

नवीन ओपन डबल डेकर बस विकत घेणार : सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात पाच ओपन डेकर बस आहेत. 16 सप्टेंबरला पहिली बस सेवेतून निवृत्त करण्यात आली यानंतर क्रमाक्रमानं या गाड्यांची सेवा थांबवण्यात आली होती. आज शेवटची बसही सेवेतून इतिहास जमा होणार आहे. वाहतूक नियमांनुसार एका बसचं आयुर्मान हे साधारण पंधरा वर्ष असते. या नियमानुसार ही बस आता निवृत्त झाली असून, ती मोडीत काढली जाणार आहे. शेवटची बस सेवेतून हद्दपार होणार असल्यानं आणि ओपन डेक बसला मिळणारा पर्यटकांचा प्रतिसाद पाहता बेस्टनं नवीन डबल डेकर ओपन डेक गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू असून, दहा बस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यात अप्पर डेक ओपन असेल आणि लोअर डेक हा वातानुकूलित आसन व्यवस्था असलेला असेल, अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आलीय.

हेही वाचा :

  1. Old Double Decker Bus : मुंबईकरांना 1937 सालापासून सेवा देणाऱ्या जुन्या 'डबल डेकर बस' सेवेतून होणार निवृत्त; का? ते वाचा सविस्तर
  2. AC Double Decker Bus: जाणून घ्या, नामशेष झालेल्या मुंबईतील डबल डेकर बसचा इतिहास
  3. BEST : जानेवारी अखेरपर्यंत बेस्टच्या ताफ्यात ५ एसी डबल डेकर बस होणार दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.