मुंबई : प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी इमारतीवरून उडी मारून ( Paras Porwal committed suicide ) आत्महत्या केली आहे. आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे. भायखळा येथे असलेल्या शांती कमल इमारतीत २३ व्या मजल्यावर ते राहत होते. राहत्या घरातून उडी घेत त्यांनी आत्महत्या केली.
मुंबईतील प्रसिद्ध विकासक पारसभाई पोरवाल याने आज सकाळी 7 च्या सुमारास ( builder suicide in Mumbai ) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पारसभाई पोरवाल हे काळाचौकी परिसरातील शांतीकमल टाॅवर मध्ये राहतात. या टाॅवरमधील वरचे तीनही माळे पोरवाल ( suicide note of Paras porwal ) यांच्या नावावर आहेत. आर्थिक अडचण आणि त्यामुळे आलेल्या टेन्शनमुळे त्यांनी इमारतीच्या 24 व्या माळ्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. पोरवाल यांनी लिहिलेली सुसाइड नोटही पोलिसांना सापडली आहे.
आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्याची शक्यताबांधकाम व्यवसायिक पारसभाई पोरवाल यांच्या इमारतीमधील जि मध्ये सुसाईड नोट मिळाली आहे. माझ्या आत्महत्याला कोणीही जबाबदार नसून कुणावरही कारवाई करण्यात येऊ नये, असे सुसाईड नोट मध्ये म्हटले आहे. भायखला येथील काळाचौकी परिसरातील शांतीकमल टॉवरमध्ये राहतात. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पारसभाई पोरवाल यांना आर्थिक अडचण होती त्याच टेन्शनमध्ये असलेल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.