ETV Bharat / state

Mumbaicha Dabewala : मुंबईकरांची भूक भागवणारा मुंबईचा डबेवाला अडचणीत, सरकारकडून मदतीची प्रतिक्षा... - मुंबईकरांची भूक भागवणारा मुंबईचा डबेवाला अडचणीत

कोविड जवळपास संपत आला आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालय बँका शाळा आणि अशा सर्व ठिकाण जेथे कर्मचारी काम करतात ती सर्व ठिकाणे जवळपास सुरू झाले असून कर्मचारी कामावर परतले. मात्र मुंबईच्या डबेवाल्याला अद्यापही हाताला ( Mumbai Dabewala trouble )काम मिळत नाही, अशीच परिस्थिती मुंबईत आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 21, 2022, 9:24 PM IST

मुंबई : मुंबईचा डबेवाला ( Mumbaicha Dabewala ) ही मुंबईची ओळख आहे. मात्र कोरोनाच्या लाटेचा मोठा फटका मुंबईच्या डबेवाल्याला बसला आहे. कोविड-19 च्या आधी जवळपास पाच हजार डबेवाले मुंबईत आपली सेवा देत होते. मात्र आता डबेवाल्यांना मुंबईत काम मिळत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. जवळपास एक हजाराच्या आसपास डबेवालेच मुंबईत आता सेवा देत आहेत.

मुंबईचा डबेवाला अडचणीत - मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडला गेलेला सामान्य माणूस म्हणजे मुंबईचा डबेवाला (Mumbaicha Dabewala ). या डबेवाल्याची ख्याती साता समुद्रापार पोहचली आहे. मुंबई करांना वेळेवर घरचे जेवण पोहोचावे यासाठी डबेवाला गेल्या अनेक वर्षापासून झटत आहे. मात्र आता यात डबेवाल्याचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळते. कोविड जवळपास संपत आला आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालय बँका शाळा आणि अशा सर्व ठिकाण जेथे कर्मचारी काम करतात ती सर्व ठिकाणे जवळपास सुरू झाले असून कर्मचारी कामावर परतले. मात्र मुंबईच्या डबेवाल्याला अद्यापही हाताला काम मिळत नाही, अशीच परिस्थिती मुंबईत आहे.

मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर संवाद साधताना

कोविडचा परिणाम - कोविड-19 येण्याआधी मुंबईत जवळपास साडेचार ते पाच हजार डबेवाले मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून मुंबईकर काम करत असलेल्या कार्यालयापर्यंत त्यांचे डबे पोहोचवत होते. जवळपास दोन लाख मुंबईकरांचे वेळेवर पोट भरण्याचं काम डबेवाला करत होता. या कामातून डबेवाला आपली आणि आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत होता. मात्र कोविड-19 नंतर डबेवाल्याच्या आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून गेले आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी होऊन जवळपास दीड वर्ष उलटत आला असला तरी डबेवाल्यांना अद्याप त्यांचं काम परत मिळालेले नाही. कोविड-19 येण्यापूर्वी जिथे पाच हजार डबेवाले मुंबई काम करत होते. तिथे आता हजार डबेवाल्यांना पुरेल एवढेच डबे पोहोचवण्याचे काम सध्या मुंबईत सुरू आहे. त्यामुळे डबेवाल्यांनी नेमकी आपली उपजीविका करायची कशी हा प्रश्न त्यांच्यावर समोर उभा राहिला आहे. कामच मिळत नसल्याने मुंबईचा डबेवाला आता इतर कामांकडे वळला आहे. आपल्या कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी हमाली, चौकीदार मजुरी किंवा मग गावी जाऊन शेती करण्याशिवाय डबेवाल्यांकडे कोणताही पर्याय उरला नसल्याची खंत, मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर सांगतात.

म्हणूनच मुंबईच्या डबेवालांच्या कामावर परिणाम - जवळपास दीड वर्ष झाले कोविडचा प्रादुर्भाव हा कमी झालेला आहे मात्र कोविड पूर्णपणे संपला अशी घोषणा अद्यापही राज्य सरकारने केली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी अजूनही डबेवाल्यांना परत डबे पोहोचवण्याचे काम मिळालेले नाही. खास करून शाळकरी मुलांचे डबे पोहोचवण्याचे काम मोठ्या प्रमाणात डबेवाल्यांकडे होते. मुंबईतील प्रसिद्ध आणि मोठ्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना घरचे जेवण वेळेवर मिळावे यासाठी त्यांच्या कुटुंबाकडून डबे पोहोचवण्याचे काम डबेवाल्यांना देण्यात आले होते. मात्र कोविड-19 चा प्रादुर्भाव असताना सर्वच काम बंद होती. त्यात डबेवाल्यांचा देखील काम बंद करण्यात आले. मात्र आता अशी परिस्थिती आहे की, अद्यापही त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना डबे पोहोचवण्याचे काम पालकांकडून मिळालेले नाही. याचे कारण शाळेने अद्यापही डबेवाल्यांसाठी परवानगी दिलेली नाही. हजारो विद्यार्थी शाळेत येतात शेकडो शिक्षक त्यांना शिकवतात त्यावेळेस मात्र कोविड-19 चा प्रादुर्भाव होत नाही मात्र एक डबेवाला शाळेत गेला तर कोविड-19 चा प्रादुर्भाव होतो, अशी धारणा कदाचित लोकांची झाली आहे म्हणूनच डबेवाल्यांना अद्यापही काम मिळालेलं नाही अशी खंत सुभाष तळेकर व्यक्त करतात.

डबेवाल्यांना पर्याय उभा राहिला - कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविड-19 चा प्रादुर्भाव होण्याआधी डबेवाल्यांकडून वेळेवर डबे पोहोचवले जात होते. मात्र कोविड-19 नंतर डबेवाले यांची सेवा बंद झाल्यानंतर घरूनच कर्मचारी डबे घेऊन जाऊ लागले किंवा कार्यालयाच्या आजूबाजूलाच जेवणाची पर्यायी व्यवस्था कर्मचाऱ्यांनी शोधली आहे. याचाही फटका कुठेतरी डबेवाल्याच्या सेवेवर बसला आहे. त्यामुळेच आता शासकीय-निमशासकीय अशी कार्यालय जरी सुरू झाली असली तरी त्यामध्ये डबा पोहोचवणाऱ्या डबेवाल्याची सेवा ही अद्यापही बंद आहे. तसेच अनेक कार्यालयामध्ये अद्यापही वर्क फ्रॉम होम ही दिले जाते, त्यामुळे कर्मचारी घरातूनच काम करतात याचाही फटका डबेवाल्यांच्या सेवेवर बसला आहे.

शासनाची अद्यापही मदत नाही - कोविडचा प्रादुर्भाव ज्यावेळेस सुरू झाला. त्यावेळी ज्याप्रकारे सर्व स्तराला त्याचा फटका बसला त्याचप्रमाणे डबेवाल्यांना देखील त्याचा फटका बसला. डबेवाला हा हातावर पोट भरत असलेला वर्ग आहे. मात्र कोविडच्या प्रादुर्भावामुळे डबेवाल्यांचा पूर्ण काम बंद झाले. त्यामुळे अनेक वेळा महाराष्ट्राची ओळख मराठी माणसांची ओळख म्हणून डबेवाल्यांकडे पाहिले जात असतानाही शासन त्यांच्या मागे उभे राहिले नाही. शासनाकडून अद्यापही कोणतीच मदत डबेवाल्यांना मिळाली नाही, केवळ सामाजिक संस्था या डबेवाल्याच्या मागे उभ्या राहिल्या म्हणूनच कोविड सारख्या कठीण काळात आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणे हे डबेवाल्याला शक्य झाले. अद्यापही कोविड-19 बऱ्याच प्रमाणात कमी झाला असला तरी डबेवाल्याची आर्थिक गाडी अजूनही रुळावर आलेली नाही, त्यामुळे शासनाने मदत करावी ही अपेक्षा डबेवाल्यांची असली तरी अद्यापही शासनाकडून डबेवाल्यांसाठी कोणतेही मदत पुरवली गेली नसल्याचे, सुभाष तळेकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.