ETV Bharat / state

Mumbai Airport : विमानतळावर एका व्यक्तीच्या बॅगेत 28 कोटी किंमतीचे 281 किलो कोकेन जप्त,एका भारतीय प्रवाशाला अटक - कोकेन जप्त

सीमाशुल्क विभागाच्या पथकाने ( Customs Department Team ) सोमवारी मुंबई विमानतळावर ( Mumbai Airport ) प्रवाशाकडून 28.1 कोटी रुपयांचे 2.81 किलो कोकेन जप्त ( Cocaine ) केले आहे. ड्फल बॅगमध्ये ड्रग्ज लपवून ठेवण्यात आले होते. तपासात असे दिसून आले आहे कीपॅक्स या व्यक्तींनी अमली पदार्थ घेऊन जाण्याचे आमिष दाखवले होते. तर ती व्यक्ती तिला फक्त सोशल मीडियावर भेटली होती. मुंबई विमानतळ सीमाशुल्क अधिकार्‍यांनी 6 जानेवारी रोजी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्धच्या मोहिमेदरम्यान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 31.29 कोटी रुपये किमतीचे 4.47 किलो हेरॉईन आणि 15.96 कोटी रुपये किमतीचे 1.596 किलो कोकेन जप्त केले होते. ( 281 kg of cocaine worth 28 crore seized )

281 kg of cocaine seized
281 किलो कोकेन जप्त
author img

By

Published : Jan 10, 2023, 11:16 AM IST

Updated : Jan 10, 2023, 12:58 PM IST

विमानतळावर एका व्यक्तीच्या बॅगेत 28 कोटी किंमतीचे 281 किलो कोकेन जप्त,एका भारतीय प्रवाशाला अटक

मुंबई : सप्टेंबर 2022 मध्ये, मुंबई विमानतळ कस्टम्सने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Mumbai International Airport ) 13 कोटी रुपयांचे 1.3 किलो कोकेन जप्त केले. पोलिसांनी घाना येथील एका प्रवाशाला 28 ऑगस्ट रोजी अटक केली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पोटात कोकेन ड्रग्ज लपवून ठेवले होते. आरोपीला रुग्णालयात नेले असता त्याच्या पोटातून ८७ कॅप्सूल जप्त करण्यात आले.आणखी एका प्रकरणात, मुंबई कस्टमने अमेरिकेतून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या आणि मुंबईत कार्यरत असलेल्या ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती.

31 किलो हेरॉईन जप्त : याआधी सात जानेवारी 2023 रोजी एकदा सीमेपलीकडून भारतात ड्रग्ज पाठवण्याचा प्रयत्न झाला होता. पंजाबच्या फाजिल्का या सीमावर्ती प्रांतात अंमली पदार्थांवर कारवाई करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले होते. पोलिसांनी तस्करांकडून 31 किलो हेरॉईन जप्त केले आहे. (Fazilka police recovered 31 kg of heroine). आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. फाजिल्का पोलिसांनी 29 बॉक्समधून 31 किलो 200 ग्रॅम हेरॉईन जप्त केले असून आंतरराष्ट्रीय बाजारात हेरॉईनची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. (Fazilka police recovered 31 kg of heroine). याशिवाय पोलिसांनी घटनास्थळी हेरॉईनसह दोन तस्करांना देखील अटक केली आहे. (31 kg of heroine from Pakistan border).

भारतीय प्रवाशाला अटक : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोकेनचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. सोमवारी, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्सने एका भारतीय प्रवाशाला अटक केली, जो डफल बॅगमध्ये 28.10 कोटी रुपयांचे सुमारे 2.81 किलो कोकेन घेऊन जात होता.या प्रवाशाला सोशल मीडियावर भेटलेल्या व्यक्तींनी अमली पदार्थ घेऊन जाण्याचे आमिष दाखविल्याचे तपासात उघड झाले आहे. कस्टम अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रवाशाला तस्करीसाठी हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात आले होते.चार दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ३१.२९ कोटी रुपये किमतीचे ४.४७ किलो हेरॉईन आणि १५.९६ कोटी रुपये किमतीचे १.५९६ किलो कोकेन जप्त केले होते.छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 32 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कोकेन आणि हेरॉईन जप्त केले आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली होती.

रॅकेटचा पर्दाफाश केला : सीमा शुल्क अधिकाऱ्याने सांगितले होते की, 31.29 कोटी रुपये किमतीचे 4.47 किलो हेरॉईन आणि 15.96 कोटी रुपये किमतीचे 1.596 किलो कोकेन कागदपत्रांच्या फोल्डरच्या कव्हरमध्ये कपड्याच्या बटणांमध्ये लपवले होते. अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात मोहीम सुरू केली आणि या रॅकेटचा पर्दाफाश केला, असे कस्टम अधिकारी म्हणाले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त : अमली पदार्थांना भारतात बंदी आहे. मात्र, तरीही भारतात चुप्या पद्धतीने काही लोक अंमली पदार्थांचा अवैध व्यापार करत असल्याचे अनेकवळा समोर आले आहे. अमली पदार्थांची किंमत ही अव्वाच्या सव्वा असते. त्यामुळे सर्वसामान्य माणूस अंमली पदार्थांची खरेदी करणे शक्यच नाही. अर्थात त्याला एखादी व्यक्ती अपवाद असू शकते. पण भारतात अंमली पदार्थांचा अवैध पद्धतीने व्यापार चालतो हे वेळोवेळी समोर आले आहे. कारण अनेकदा कस्टम विभाग आणि इतर विभागांनी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.

मुंबई विमानतळावर कारवाई : नवी मुंबईच्या वाशी शहरात काल एका ट्रकमध्ये गेल्या वर्षी तब्बल 1476 कोटींचे ड्रग्ज जप्त केले असताना पुन्हा ड्रग्जशी संबंधित बातमी समोर आली आहे. यावेळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईतेखील तब्बल 35 कोटी रुपयांचे ड्रग्ज आढळले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई ही ड्रग्ज तस्कारांचा अड्डा तर होत नाहीय ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.अलीकडेच मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने खूप मोठी कारवाई केली होती. कस्टम विभागाने तब्ल 35 कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले. एका विदेशी नागरिकाने हे ड्रग्ज विमानतळावर आणले होते. त्याच्या सूटकेसमध्ये हे ड्रग्ज सापडले. तो ट्रॉली बॅगमध्ये लपवून ड्रग्ज भारतात आणत होता. पण कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची चोरी पकडली. आरोपी विदेशी नागरिकाच्या बॅगेत पाच किलो हाय क्लालिटीचे हेरॉईन सापडले. या हेरॉईनची किंमत 35 कोटी रुपये इतकी होती.

Last Updated : Jan 10, 2023, 12:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.