ETV Bharat / state

मेक्सिकन 'डीजे'वर बलात्कार करुन अनैसर्गिक अत्याचार; वांद्रे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या - पोलीस निरीक्षक संजय मोहिते

Mumbai Crime News : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आलीय. संगीताच्या कार्यक्रमासाठी आलेल्या मेक्सिकन महिला 'डिजे'वर बलात्कार करुन तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. याप्रकरणी एका नराधमाला अटक करण्यात आली आहे.

Mumbai Crime News
आरोपी प्रतीक पांडे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 11:23 AM IST

Updated : Dec 6, 2023, 10:13 AM IST

मुंबई Mumbai Crime News : पश्चिम उपनगरातील वांद्रे इथं एका संगीताच्या कार्यक्रमासाठी आलेल्या मेक्सिकन महिला 'डिजे'वर बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात म्युझिक इव्हेंट कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर परदेशी महिलेचा लैंगिक छळ करणाऱ्या स्लिक एंटरटेनमेंटच्या 36 वर्षीय मालकाला वांद्रे पोलिसांनी अटक केलीय. प्रतीक पांडे असं या आरोपीचं नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोहिते यांनी दिली आहे.

मेक्सिकन 'डीजे'वर बलात्कार करुन अनैसर्गिक अत्याचार

नेमकं प्रकरण काय : याविषयी अधिक माहिती अशी की, पीडिता मॅक्सिकन 'डीजे' महिला मॉडेल बनण्यासाठी मुंबईत आली होती. प्रतीक पांडेनं तिला 2019 मध्ये प्रथम अश्लिल जोक पाठविले होते. आरोपीनं काम देण्याच्या बहाण्यानं वांद्र्यातील त्याच्या घरी महिलेवर जबरदस्ती करत शारीरिक शोषणंही केलं होतं. काम देण्याच्या बदल्यात त्यानं तिचा लैंगिक छळ केला होता. त्याचप्रमाणं चालत्या ऑटोमध्ये आरोपी तिचा हात धरायचा आणि त्याच्या खासगी भागास हात लावण्यास सांगायचा असा आरोप पीडितेनं तक्रारीत केला आहे. तसंच या पीडितेवर कोलकाता, बंगळुरू, इंदूर आणि आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सव टुमॉरोलँड इथं अनेकदा बलात्कार करण्यात आल्याचंही तीनं तक्रारीत सांगितलंय. आरोपी प्रतीक पांडेनं पीडितेच्या मित्राला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. आरोपी तिला ओरल सेक्स करण्यास जबरदस्ती करायचा तसंच तिचे आक्षेपार्ह फोटो काढून अश्लील आणि धमकीचे संदेश पाठवत असल्याचा दावा पीडितेच्या वकिलांनी केलाय.

2 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी : यातील आरोपी पांडे हा विवाहित आहे. 2020 मध्ये त्याचं लग्न झालंय. वांद्रे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीवर बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक संबंध, गुन्हेगारी धमकी, लैंगिक छळ, स्टाकिंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रतीकला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून वांद्रे पोलीस त्याची चौकशी करत असल्याची माहिती वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

हेही वाचा :

  1. ७ महिने, १४ खून...एकच पॅटर्न! ४० ते ७० वर्षे वयोगटातील महिला निशाण्यावर; सिरियल किलिंगच्या घटनांनी दहशत
  2. धक्कादायक! आधी पत्नीला जिवंत जाळलं, मग दगडानं ठेचून सासऱ्याची केली हत्या, गोळी झाडून केली आत्महत्या
  3. घरासमोर दुचाकीचा हॉर्न मोठ्यानं वाजविणं पडलं महागात; भाडेकरूकडून घरमालकाची हत्या

Last Updated : Dec 6, 2023, 10:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.