मुंबई Fake ED Officer : आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला खंडणी मागितल्या प्रकरणी अनिल भोसले यांच्या पत्नी रश्मी भोसले यांच्या तक्रारीनुसार वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसलेंना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. भोसले यांच्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत 70 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
काय आहे प्रकरण : ईडीचे अधिकारी सुनील कुमार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार, माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल भोसले यांची पत्नी रेश्मा भोसले २६ ऑक्टोबरला वरळी येथील ईडी कार्यालयात आल्या होत्या. त्यांनी घडलेली हकीकत सांगितली. 23 ऑक्टोबरला एका अज्ञात व्यक्तीनं स्वत:ला ईडी अधिकारी असल्याचं सांगून रेअनिल भोसले यांना या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी 15 कोटी रुपयांची मागणी केली होती.
तपास सुरू : रेश्मा भोसले यांनी केलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 120(बी), 170, 384, 419, 420, 468 आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा 66(सी) आणि 66(डी) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. अज्ञात बोगस ईडी अधिकाऱ्यांचा माग काढण्यासाठी वरळी पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आहेत. वरळी पोलीस ठाण्याची पथके या अज्ञात बोगस ईडी अधिकाऱ्यांचा कसून तपास करत आहेत.
सहकारी बँकेतील घोटाळ्याचा आरोप : दरम्यान, अनिल भोसले यांच्यावर 70 कोटी 78 लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. ईडीनं मार्च 2021 मध्ये अनिल भोसले यांना घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी अटक केली होती. त्यांना अटक करण्यापूर्वी 2016 पासून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत होता. या बँकेच्या घोटाळ्यासंबंधी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये सर्वप्रथम गुन्हा नोंदवण्यात आला होता. पुणे पोलिसांच्या एफआयआरचा आधार घेत ईडीनं प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट कायद्याअंतर्गत आरोपपत्र नोंद केलं होतं. त्यानंतर त्याच्याच आधारे अनिल भोसलेंना ईडीनं अटक केली होती.
हेही वाचा -