मुंबई Mumbai Crime News : जोगेश्वरी येथील व्यापारी शहाबुद्दीन इकबाल मंडई (वय ३०) हे सोन्याचे दागिने विकण्यासाठी झवेरी बाजार (Zaveri Bazar) येथील अरिहंत टच सेंटरमध्ये आले होते. सोन्याचे वजन करत असताना जगदीश बगाराम माली याने शहाबुद्दीनची नजर चुकवून काउंटरवरून सोन्याची बॅग घेऊन पळ काढला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 70 लाख रुपये किंमतीचे 1270 ग्रॅमचे दागिने चोरीला गेले आहेत. २६ ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी दुपारी ४.५० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मात्र, मित्र परत येईल म्हणून शहाबुद्दीनने १ दिवस वाट पहिली नंतर त्याने शनिवारी एलटी मार्ग पोलिसात (LT Marg Police Station) जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी जगदीश माली या मूळचा राजस्थानचा असलेल्या व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
एलटी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार: एलटी मार्ग पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जगदीश बगराम माली हा तक्रारदाराचा मित्र असून तोही त्याच्यासोबत आला होता. दागिने विकण्यासाठी शहाबुद्दीन मंडई झवेरी बाजारातील ज्वेलर्सकडे गेल्यावर जगदीश मालीने शहाबुद्दीनला पाच मिनिटांत येतो असं सांगितलं आणि निघून गेला. बराच वेळ माली न आल्याने मंडईने त्याला मोबाईलवर कॉल केला. मात्र, मोबाईल फोन बंद येत होता. दरम्यान, शहाबुद्दीन मंडईला त्याच्याजवळ असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग दिसली नाही. त्यानंतर दुकानात लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर माली दागिन्यांची बॅग घेऊन निघून गेल्याचे त्या सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. त्यामुळे तक्रारदार शहाबुद्दीन मंडई यांनी एलटी मार्ग पोलिस ठाण्यात मित्र जगदीश माली विरोधात तक्रार दाखल केली.
आरोपीचा शोध सुरू : माली याच्या ओळखीने सोने व्यापारी असलेला शहाबुद्दीन मंडई हे तक्रारदार सोने विकण्यास झवेरी बाजारमधील व्यापाराकडे आले असल्याची माहिती, पोलीस सूत्रांकडून मिळत आहे. अद्याप आरोपीचा सुगावा लागला नसून एलटी मार्ग पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -