ETV Bharat / state

बालकांची तस्करी प्रकरण: अडीच लाखात विकलं होतं मूल, गुन्हे शाखेनं आणखी तीन महिलांना केली अटक

Mumbai Crime News : लहान मुलांच्या तस्करी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 9 नं 29 दिवसांच्या मुलाची सुटका करुन तीन महिलांना अटक केलीय. आतापर्यंत याप्रकरणात एकूण 11 जणांना अटक करण्यात आलीय.

बालकांची तस्करी प्रकरण
बालकांची तस्करी प्रकरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 7:11 AM IST

मुंबई Mumbai Crime News : बालक तस्करीच्या रॅकेटचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेनं आणखी तीन महिला आरोपींना अटक केलीय. तसंच त्यांच्याकडून 29 दिवसांच्या मुलाची सुटका करण्यात आलीय. या महिलांकडून आणखी गुन्हे उघडकीस येऊ शकतात, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अडीच लाख रुपयांत मुलाची विक्री : युनिट नऊच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, सुटका करण्यात आलेल्या 29 दिवसांच्या मुलाची अडीच लाख रुपयांना विक्री करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, अटक करण्यात आलेल्या तीन महिलांपैकी दोन महिलांनी मूल विकलं होतं आणि एका महिलेनं ते मूल विकत घेतलं होतं. सुटका करण्यात आलेलं हे मूल कोणाचं आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट 9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक म्हणाले की, सुरुवातीच्या अटकेनंतर आम्ही या अवैध बाल तस्करीला प्रोत्साहन देणाऱ्या एजंट आणि मध्यस्थांचा शोध सुरु केलाय. याप्रकरणी आम्ही आतापर्यंत एकूण अकरा जणांना अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सनोबर चिपळूणकर हा रत्नागिरीचा रहिवासी असून त्यानं हे मूल विकत घेतलं होतं. तबस्सुम सैन वय 42 आणि सफिया अली वय 42 या दोघींनी मुलाला विकलं होतं. सैन ही चिपळूणची रहिवासी आहे तर अली ही ग्रँट रोड मुंबई इथली राहणारी आहे.

आतापर्यंत अकरा जणांना अटक : अटक करण्यात आलेले टोळीतील आरोपी मुलं विकायचे आणि खरेदीसाठी ग्राहक आणायचे. तसंच विक्री केल्यानंतर आरोपी ठराविक रक्कम स्वत:कडं ठेवायचे. याची सुरुवात मुंबईच्या अंधेरी भागातून झाली. या प्रकरणात आधी एका जोडप्याला पकडण्यात आलं होतं. त्यानंतर एकामागून एक माहिती मिळत गेली आणि आतापर्यंत 11 आरोपींना अटक करण्यात आलीय. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, आतापर्यंत केलेल्या तपासात ही टोळी संपूर्ण राज्यात सक्रिय असल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणाचा अन्य राज्यांशीही संबंध असण्याची शक्यता पोलिसांना असून त्या दृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे.

हेही वाचा :

  1. Child Trafficking Racket : आंतरराज्यीय बाल तस्करी उघड; मुंबईतील बाल तस्करीचे धागेदोरे हैदराबादेत, मुंबई पोलिसांकडून झाडाझडती सुरू
  2. Nashik Crime News : रेल्वे पोलिसांकडून बिहारमधील 60 मुलांची सुटका, मदरशाच्या नावाखाली मुलांच्या तस्करीचा धंदा?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.