ETV Bharat / state

Mumbai Crime News : ऑनलाईन अ‍ॅपवरची मैत्री पडली महागात; लग्नाच्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवले अन्... - obscene video

Mumbai Crime News : वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 24 वर्षीय महिलेचा अश्लील व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात आरोपी समीर शेख विरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आलाय.

Mumbai Crime News
ऑनलाईन अ‍ॅपवर झालेली मैत्री पडली महागात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 4:02 PM IST

मुंबई Mumbai Crime News : वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 24 वर्षीय महिलेला छत्रपती संभाजीनगर येथे बोलावून तिचा अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. दरम्यान, या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात आरोपी समीर शेख विरुद्ध कलम भारतीय दंड संविधान ३७६,३७६ (२) (एन), ३८४,५०६ आणि ४१७ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आलाय. तसंच सदरील महिलेनं वाकोला पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हंटलय की, ती एका व्यक्तीला अ‍ॅपवर भेटली आणि त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. नंतर महिलेचा विवस्त्र अवस्थेत व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने महिलेकडून 70 हजार रुपये आणि दोन मोबाईल काढून घेतले.

'ओला पार्टी' अ‍ॅपवर झाली होती भेट : वाकोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत नोकरी करणाऱ्या २४ वर्षीय महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तिची समीर सलीम शेख (वय २३) याच्याशी 'ओला पार्टी' अ‍ॅपवर भेट झाली. अ‍ॅपवरील चॅटदरम्यान दोघांनीही आपले नंबर एकमेकांना शेअर केले. शेख याने महिलेला व्हिडिओ कॉल करून स्वतःच्या गळ्यावर चाकू ठेवून तू मला भेटायला आली नाहीस तर मी माझा गळा कापून टाकेन अशी भीती दाखवली. यानंतर घाबरुन पीडित महिला त्याला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गेली. ही महिला शेखला भेटायला गेली असता त्याने तिथल्या एका हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. शेखने लग्नाच्या बहाण्याने महिलेशी शारीरिक संबंध ठेवले. यावेळी आरोपी शेखने महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवला.

व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी : त्यानंतर आरोपीने महिलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरल होईल या भीतीने महिलेनं शेखला ७० हजार रुपये आणि दोन मोबाईल दिले. वाकोला पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पैसे आणि मोबाईल घेऊनही संतुष्ट न झालेला शेख महिलेकडे अधिक पैशांची मागणी करत होता. मात्र, ती महिला दिवसेंदिवस वाढत चाललेली मागणी पूर्ण करू शकली नाही. अखेर सदरील महिलेनं शेखविरुद्ध वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा -

Pune Crime : सोशल मीडियावरील ओळख पडली महागात; कॉलेज तरुणाचं अपहरण करुन केलं अनैसर्गिक कृत्य

Six People Murdered in Deoria : उत्तर प्रदेश हादरलं! जुन्या वादातून माजी जिल्हा परिषद सदस्यासह 6 जणांची हत्या

Sexual Assault With Animal : लैंगिक भूक भागवण्यासाठी रेडकावर करायचा अनैसर्गिक अत्याचार; वाचा कसं फुटलं बिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.