ETV Bharat / state

Mumbai Crime : चालत्या लोकलमध्ये तरुणीशी अश्‍लील चाळे, आरोपी तरुणाला अंधेरी रेल्वे स्थानकावर अटक - मुंबई क्राईम न्यूज

चालत्या लोकलमध्ये तरुणीशी अश्लील चाळे करणाऱ्या तरुणास निर्भया पथकाच्या महिला पोलिसांनी अंधेरी रेल्वे स्थानकावर पकडलं. हा तरुण मूळचा बिहारचा रहिवासी आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं.

Crime
Crime
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2023, 9:21 AM IST

मुंबई : चालत्या लोकलमध्ये एका १९ वर्षांच्या तरुणीशी अश्‍लील चाळे करुन तिचा नराधमानं विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी-विलेपार्ले रेल्वे स्थानकादरम्यान घडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणास अंधेरी रेल्वे स्थानकावरुन अटक केली आहे.

आरोपी मूळ बिहारचा : भरत बहादूर पंडित (वय 26 वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तो मूळचा बिहारच्या मधुबनीचा रहिवासी आहे. हा तरुण सध्या विलेपार्ले परिसरात राहतो, असं सहायक पोलीस आयुक्त बाजीराव महाजन यांनी सांगितलं. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं.

चालत्या लोकलमध्ये विनयभंगाचा प्रयत्न : तक्रारदार तरुणी वसई येथील रहिवासी आहे. बुधवारी सकाळी पावणेअकरा वाजता ती विलेपार्ले-अंधेरी लोकलनं प्रवास करत होती. दरम्यान, मागे उभा असलेल्या एका तरुणानं अश्‍लील चाळे करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तिनं याकडं दुर्लक्ष केलं. मात्र, अंधेरी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्यानं पुन्हा तिच्याशी अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिथं उपस्थित असलेल्या निर्भया पथकाच्या महिला पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यांनी तरुणीकडं याबाबत विचारपूस केली असता तिनं तिच्यासोबत घडललेला सर्व प्रकार सांगितला.

निर्भया पथकाच्या पोलिसांनी पकडलं : त्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या भरत पंडित या तरुणाला मिनाक्षी कळंबे, मिनाक्षी सरवदे, सविता सातव, नविता तांडेल या महिला पोलिसांनी पकडलं. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. पीडित तरुणीनं दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्या विरुद्ध भारतीय दंड संविधान कलम ३५४ अ अंतर्गत गुन्हा नोंदवला.

तरुणाला अंधेरीतील स्थानिक न्यायालयात करण्यात आलं हजर : अटकेनंतर तरुणाला अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक देशमाने करत असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव महाजन यांनी सांगितलं. चालत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग करणार्‍या आरोपीस पळून जाण्याची कुठलीही संधी न देता घटनास्थळीच अटक करणाऱ्या निर्भया पथकाच्या महिला पोलिसांचं सर्वत्र कौतूक होत आहे.

हेही वाचा :

  1. Mumbai Police : 10 वर्षाच्या मुलाने उडवली मुंबई पोलिसांची झोप; कॉलवर दिली 'ही' खळबळजनक माहिती
  2. मुंबईत चालत्या रिक्षामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, रिक्षा चालकास अटक
  3. Sexual abuse students: महापालिकेच्या शाळेत ३ विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण, पालकांनी चोप दिल्यानंतर पीटीच्या शिक्षकाला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.