मुंबई : कमलेश उर्फ बंटी सोलंकी हा मॅनहोलच्या झाकणांची चोरी करून अब्दुल नजीर शहा याला चोरीच्या झाकणाची विक्री करायचा. सोलंकी नशेसाठी झाकणाची चोरी करायचा, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. बोरिवली परिसरात तब्बल 26 झाकणांची चोरी झाली होती. आयसी कॉलनी येथील डांबरी रस्त्यावर मध्यभागी असलेले लोखंडी झाकण चोरीला गेले होते. पालिकेच्या आर मध्य विभागाकडून 20 जून रोजी प्राजक्ता दवंगे यांनी तक्रार दिली होती.
एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहायक निरीक्षक सूर्यकांत पवार आणि पोलीस निरीक्षक अखिलेश बॉम्बे व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. बोरिवलीतील एका सीसीटीव्हीमध्ये सोलंकी झाकण चोरताना कैद झाल्याचे आढळून आले.
मॅनहोलच्या लोखंडी झाकणाची चोरी : पोलीस चौकशीत बंटी सोलंकी याने नशा करण्यासाठी अवघ्या 25 रुपये किलोने भंगार विक्रेता शहा याला ही झाकणे विकल्याचे उघड झाले आहे. आरोपीकडून चोरी केलेल्या झाकणांचे साडेनऊ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. 20 जूनला आर मध्य विभाग, बृहन्मुंबई महानगर पालिकेतर्फे फिर्यादी प्राजक्ता दिलीप दवंगे (वय 26) यांनी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात येवून तक्रार दिली की, कल्पना चावला रोड, शांती आश्रम बस डेपो, आयसी कॉलनी, बोरीवली पश्चिम, मुंबई येथील डांबरी रोडवरील मध्यभागी असलेले मॅनहोलचे लोखंडी कोणीतीरी अज्ञात इसमाने चोरी केलेले आहेत. त्यावरून तक्रारदारचा सविस्तर जबाब नोंद करून भारतीय दंड संविधान कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्यात अटक : या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण अधिकारी अखिलेश बोंबे व पथक यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दिनांक 22 जूनला आरोपी कमलेश उर्फ बंटी जगदिश सोलंकी (वय 29) हा या सीसीटीव्हीत दिसून आला. त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये त्याने चोरी केलेले झाकण हे आरोपी नामअब्दुल गली मोहम्मद नजीर शाह (वय 51) यास विक्री केल्याचे आढळून आले. त्यास देखील या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
हेही वाचा :