मुंबई : Mumbai Crime News : दोन समाजात दंगली घडवण्याचा मोठा कट रचत आहेत. त्यांचे मंदीर, मस्जिद, चर्च हे टार्गेट आहेत, अशा आशयाचे अनेक अर्ज भोईवाडा पोलीस ठाणे ( Bhoiwada Police Station) तसेच मुंबई शहरातील इतर अनेक पोलीस ठाण्यांना प्राप्त होत होते. त्यामुळे अशी खोटी माहिती पसरवून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अल्पवयीन मुलाला भोईवाडा पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतलं आहे.
भारतात दंगली घडवण्याचा डाव : याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 505 (1) (ब), 506 (2), 182 आणि 34 कलमांन्वये नोंद आहे. या गुन्ह्याची अधिक माहिती अशी की, भोईवाडा पोलीस ठाणे तसेच, मुंबई शहरातील इतर अनेक पोलीस ठाण्यांना अनेक अर्ज प्राप्त होत होते. त्यात अर्जदार अनेक लोकांची नावे आणि मोबाईल नंबर देऊन PFI या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून ते भारतात दंगली घडवण्याचा डाव रचत आहेत, अशी माहिती अर्जाद्वारे अज्ञात व्यक्तीनं दिली होती.
मंदीर, मस्जिद आणि चर्च टार्गेट : दोन समाजात दंगली घडवण्याचा मोठा कट रचत आहेत. त्या दहशतवाद्यांचे मंदीर, मस्जिद आणि चर्च हे टार्गेट आहेत. PFI संघटनेचे सदस्य हे जम्मु काश्मीर येथून मुंबईत आले आहेत. ते सदस्य मुंबई शहर आणि उपनगरात दंगली घडवणार आहेत. ते गावी प्रशिक्षण घेऊन मुंबईत घातपात घडवण्यासाठी आले आहेत, असे अर्जात आणि पत्रात अज्ञात व्यक्तीनं नमूद केलं होतं.
दोन समाजात दंगली : PFI च्या सदस्यांच्या मुंबईत दोन समाजात दंगली घडवण्याबाबत बैठका झाल्या आहेत, अशी खोटी माहिती जाणीवपूर्वक देऊन लोकांच्या मनामध्ये अज्ञात व्यक्ती भिती निर्माण करत होते. अशांतता निर्माण करुन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचं कृत्य करण्यात येत होतं. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी अर्जाद्वारे देण्यात आली होती.
विधी संघर्षग्रस्त बालकाला घेतलं ताब्यात : भोईवाडा पोलिसांनी सापळा रचून तक्रार अर्ज पोस्ट करणाऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतलं. त्याच्याकडं आधिक तपास केला असता, या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा विधी संघर्षग्रस्त बालकाकडून सर्व तक्रार अर्ज पोस्ट करत असल्याचं विधी संघर्षग्रस्त बालकानं सांगितलं. विधी संघर्षग्रस्त बालकाचा ताबा सुरक्षिततरित्या त्याच्या वडिलांकडं देण्यात आला. यातील संशयित आरोपींचा शोध घेऊन पुढील कारवाई करत असल्याचं भोईवाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
हेही वाचा -
- Thane Crime News: स्वातंत्र्यदिनी स्टेटस ठेवणे तरुणाला पडले महागात; पोलिसांनी आरोपी तरुणाला केली अटक
- Mumbai Blast Case : मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात अखेर विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती, उच्च न्यायालयानं खडसावल्यानंतर सरकारला जाग
- Mumbai Crime News : मुंबईत माफिया अतिक अहमदच्या नावानं गोळीबार, जमीन हडपण्याचा प्रयत्न