ETV Bharat / state

पुन्हा एकदा खोट्या प्रकरणात अडकवल्याचा सचिन वझेंचा दावा; व्हाट्सअ‌ॅप स्टेटसमधून व्यक्त केला मृत्यूचा विचार? - सचिन वझे आत्महत्या विचार न्यूज

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक आणि गाडी प्रकरणाचा तपास सुरू आहे. या तपासात अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. स्फोटकांच्या संदर्भातील एकमेव साक्षीदार मनसुख हिरेनचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई पोलीस खात्यातील क्राईम ब्रांच अधिकारी सचिन वझे वादात सापडले आहेत.

sachin-vaze
सचिन वझे
author img

By

Published : Mar 13, 2021, 11:21 AM IST

Updated : Mar 13, 2021, 12:04 PM IST

मुंबई - सध्या वादात सापडलेले क्राईम ब्रांच अधिकारी सचिन वझे यांच्या व्हाट्सअ‌ॅप स्टेटसवर लिहिलेल्या कथित मजकुरामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. या मजकुरामुळे अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सहकारी खोट्या प्रकरणात अडकवत असल्याचा दावा या मजकुरात करण्यात आला आहे. वझे यांनी ठाण्यातील सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. 19 मार्चला त्यावर सुनावणी होणार आहे.

सचिन वझेंचे व्हाट्सअ‌ॅप स्टेटस
सचिन वझेंचे व्हाट्सअ‌ॅप स्टेटस

सहकाऱ्यांकडून खोट्या केसमध्ये अडकवले जात आहे?

सचिन वझे यांनी त्यांच्या व्हाट्सअ‌ॅप स्टेटसला ठेवलेल्या मजकुरानुसार, 3 मार्च 2004ला त्यांच्याच खात्यातील काही अधिकाऱ्यांनी सीआयडीच्या माध्यमातून त्यांना एका खोट्या केसमध्ये अडकवून अटक केली होती. अगोदरचा इतिहास पाहता पुन्हा एकदा अशा प्रकारची गोष्ट होत असून माझ्याच खात्यातील काही सहकाऱ्यांनी मला चुकीच्या प्रकरणांमध्ये पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असे त्यामध्ये दिसत आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये फरक असला तरी या अगोदरच्या प्रकरणातून सावरण्यासाठी मला 17 वर्षे संयम, माझे आयुष्य आणि पोलीस खात्यात सेवा द्यावी लागलेली आहे. मात्र, आता पुढची 17 वर्ष हे सगळे सहन करण्यासाठी माझ्याकडे सेवा आणि संयम या दोन्ही गोष्टी नसणार आहेत. त्यामुळे माझ्या मते या जगाला निरोप देण्याची वेळ जवळ आली असल्याचेही वझे यांनी त्यांच्या स्टेटसमध्ये म्हटले आहे. आता या स्टेटसवरुन तपास यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. यासंदर्भातही चौकशी होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण -

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भातील एकमेव साक्षीदार मनसुख हिरेनचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई पोलीस खात्यातील क्राईम ब्रांच अधिकारी सचिन वझे वादात सापडले आहेत. त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. तूर्तास सचिन वझे यांना मुंबई क्राईम ब्रांचमधून हटवण्यात आले असून त्यांना नागरी सुविधा केंद्र कक्ष -1 येथे पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा - रेखा जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ बोठे हैदराबादमध्ये जेरबंद

Last Updated : Mar 13, 2021, 12:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.