ETV Bharat / state

DCP Raj Tilak Roushan : नावाप्रमाणेच कामगिरी; मुंबई पोलीस दलातील DCP राज तिलक रोशन IPS ट्रेनिंगमध्ये टॉपर - राज तिलक रोशन

DCP Raj Tilak Roushan : डीसीपी राज तिलक रोशन मुंबई क्राइम ब्रँचमध्ये चर्चेत आहेत. देशातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात ते अव्वल ठरले आहेत. या मिड-करिअर ट्रेनिंग प्रोग्राम (MCTP) प्रशिक्षणात 2008 ते 2016 च्या बॅचमधील 92 आयपीएस अधिकारी सहभागी झाले होते.

DCP Raj Tilak Roshan
DCP राज तिलक रोशन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 10:03 PM IST

मुंबई DCP Raj Tilak Roushan : हैदराबाद येथे झालेल्या देशातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांना सर्वाधिक 88.25 गुण मिळाले आहेत. राज तिलक रोशन यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमीनं (Sardar Vallabhbhai Patel National Police Academy) प्रमाणपत्र दिलं आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलाच्या शिरपेचात कौतुकाचा तुरा रोवला गेला आहे.

आयपीएस अधिकारी सहभागी : हे आयपीएस प्रशिक्षण 4 ते 29 सप्टेंबर दरम्यान झालं. या प्रशिक्षणात 2008 ते 2016 या कालावधीतील आयपीएस अधिकारी सहभागी झाले होते. हे फेज तीन प्रशिक्षण होतं. जेव्हा एखाद्याची आयपीएसमध्ये निवड होते तेव्हा त्याला पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण दिलं जातं. काही वर्षांनी त्याना दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं.

88.25 गुण मिळवून टॉपर : मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन हे 2013 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी (SVPNPA) येथे आयोजित मिड-करिअर ट्रेनिंग प्रोग्राम (MCTP) मध्ये सर्वाधिक गुण म्हणजेच 100 पैकी 88.25 गुण मिळवून टॉपर आले आहेत. राज तिलक रोशन यांच्यानंतरचे टॉपर हे मिझोरामचे पोलीस अधीक्षक राहुल हे असून त्यांना शंभर पैकी 88 गुण मिळाले आहेत.

मुंबई पोलीस दलात बदली : 4 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर पर्यंत चाललेल्या या मिड-करिअर ट्रेनिंग प्रोग्राम प्रक्षिणात 2008 ते 2016 च्या बॅचमधील 92 आयपीएस अधिकारी सहभागी झाले होते. राज तिलक रोशन हे मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत यापूर्वी कार्यरत होते. त्यानंतर त्यांची मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. राज तिलक रोशन यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन अँड इंजिनिअरिंग (E&ECE) मध्ये IIT खरगपूर मधून B.Tech पदवी संपादन केली आहे.

हेही वाचा -

  1. Ajit Pawar on Meera Borwankar : भूखंडाबद्दल 'मी' बोरवणकरांना विचारलं पण...; काय म्हणाले अजित पवार? वाचा सविस्तर
  2. Ravindra Singhal Fitness: आयपीएस अधिकारी रवींद्र सिंगल यांच्या फिटनेसचं रहस्य काय आहे? पाहा व्हिडिओ
  3. Rashmi Shukla New DGP : रश्मी शुक्लांचं कमबॅक; थेट महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.