मुंबई - शहरात आज (गुरूवार) कोरोनाचे 1 हजार 350 नवे रुग्ण आढळून आले असून 30 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 40 हजार 882 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 7 हजार 532 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 834 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 13 हजार 577 वर गेला आहे. सध्या मुंबईत 19 हजार 460 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्क्यांवर पोहचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवसांवर पोहचला आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 30 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 27 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 19 पुरुष तर 9 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 834 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 1 लाख 13 हजार 577 वर पोहचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 40 हजार 882 रुग्ण असून 1 लाख 13 हजार 577 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 7 हजार 532 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 19 हजार 460 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवस तर सरासरी दर 0.81 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 557 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 738 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 7 लाख 34 हजार 619 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.