मुंबई - शहरात गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या ( Measles outbreak in Mumbai ) झपाट्याने वाढत आहे. महापालिकेच्या २४ पैकी १८ विभागात गोवरचा प्रसार झाला आहे. आतापर्यंत निश्चित निदान झालेले एकूण ४६३ रुग्णांची तर ४९३६ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी साकीनाका येथे राहणाऱ्या ४ वर्षीय मुलीचा मृत्यू ( Four Years Girl Died Due To Measles In Sakinaka Area Of Mumbai ) झाल्याने मृतांचा आकडा १६ झाला आहे. त्यापैकी १३ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबई बाहेरील आहेत. सध्या २३ रुग्ण ऑक्सीजनवर, ५ रुग्ण आयसीयुमध्ये तर १ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने ( Mumbai Corporation Health Officer Give Information About Measles Disease) दिली आहे.
२३ रुग्ण ऑक्सीजनवर, तर १ व्हेंटिलेटरवर - मुंबईत ८० लाख ३६ हजार ११० घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ४९३६ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे निश्चित निदान झालेले ४६२ रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात ३४५ बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी १४६ बेडवर रुग्ण असून इतर बेड रिक्त आहेत. १६४ जनरल बेडपैकी ११८, १४६ ऑक्सीजन बेड पैकी २३, ३५ आयसीयु बेडपैकी ३ बेडवर रुग्ण आहेत. १९ व्हेंटिलेटर असून त्यापैकी १ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे.
बालकांना गोवरची अतिरिक्त लस - आतापर्यंत अतिरिक्त सत्रात २३ हजार ६७७ मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. ९ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या २ लाख ३५ हजार ८७८ मुलांपैकी ३४,७८१ बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्यात आली आहे. मुंबईत ९ महिने पेक्षा कमी वयाच्या रुग्णांचे प्रमाण १० टक्के पेक्षा अधिक आहे, अशा विभागातील ६ ते ९ महिन्यातील ५२९३ बालकांपैकी ११०० बालकांना गोवरची अतिरिक्त लस (Vaccine Of Measles) देण्यात आली आहे.
मुंबईत १३ तर बाहेरील ३ मृत्यू - मुंबईमधील रुग्णालयात आतापर्यंत एकूण १६ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी १३ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहेत. मुंबईमधील एकूण १३ मृत्यूपैकी ८ जणांचा मृत्यू गोवारमुळे( 8 Child Died Due To Measles In Mumbai )झाला आहे. ५ जणांचा मृत्यू संशयित म्हणून नोंद झाला आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक ( Death Audit Committee Meeting In Mumbai ) आयोजित केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल, त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
महापालिकेने या केल्या उपाययोजना - गोवर रुग्ण शोधण्यासाठी महापालिकेच्या वतीने घराघरात जाऊन भेटी दिल्या जात आहेत. दैनंदिन सर्व्हेक्षण करून अॅटिव्ह रुग्ण शोधून काढत आहेत. संशयित रुग्णांना व्हिटॅमिन "अ" दिले जात आहे. यामुळे मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते तसेच मृत्यूचे प्रमाण रोखणे शक्य होते. लसीकरण झाले नाही, वजन कमी, दाटीवाटीने राहणारे लोक, एकाच घरात जास्त संख्येने मुले असणे, रक्तक्षय, अॅनिमिया यामुळे मृत्यू वाढू शकतात. यासाठी व्हिटॅमिन "अ" देणे, लक्षणे दिसल्यास रुग्णालयात भरती करणे, त्यांच्यावर ताबडतोब उपचार करणे या उपाययोजना केल्या तर मृत्यूचे प्रमाण रोखता येऊ शकते. मुलांना वेळेवर लसीकरण करणे हे सुद्धा महत्वाचे आहे. विविध रुग्णालयात ३०० हून अधिक बेडस तयार आहेत. त्यापैकी बहुतेक बेड रिक्त आहेत. आयसीयु आणि व्हेंटिलेटर तयार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.