मुंबई: मुंबईत गेल्या २४ तासात ९ हजार ९७३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८६७ नवे रुग्ण आढळून आले Mumbai Corona Update आहेत. आज शून्य मृत्यूंची नोंद झाली आहे. ४८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ३१ हजार ७०६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ७ हजार ४१९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ हजार ६२४ सक्रिय रुग्ण Active Corona Patients आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १३५२ दिवस इतका आहे
रुग्णसंख्येत वाढ मुंबईत दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. दरम्यान दोन लाटा आल्या. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्णांची नोंद झाले त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती.
जून महिन्यात रुग्णसंख्या वाढली मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली २ ऑगस्टला ३२९ ३ ऑगस्टला ४३४ ४ ऑगस्टला ४१० ५ ऑगस्टला ४४६ ६ ऑगस्टला ४८६ ७ ऑगस्टला ४६५ ८ ऑगस्टला ४०७ ९ ऑगस्टला ४७९ १० ऑगस्टला ८५२ ११ ऑगस्टला ६८३ १२ ऑगस्टला ८७१ १३ ऑगस्टला ८६७ रुग्णांची नोंद झाली
११६ वेळा शून्य मृत्यूची नोंद मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ११६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा एप्रिल महिन्यात २६ वेळा मे महिन्यात २८ वेळा जून महिन्यात ७ वेळा जुलै महिन्यात ६ वेळा तर ऑगस्ट महिन्यात ४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे
हेही वाचा Indian Independence Day अग्निशमन दलात पहिल्यांदाच दोन महिलांची केंद्र प्रमुख पदावर नियुक्ती