मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ( Corona Patients Increasing In Mumbai ) पहिल्या लाटेदरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. तिसऱ्या लाटेत ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. ( Mumbai Corona Update on 15th jan 2022 ) यानंतर रुग्णसंख्येत घट झाली असली तरी सतत चढ उतार पाहायला मिळत आहे. गुरुवारी रुग्णसंख्येत घट होऊन १३७०२ शुक्रवारी ११३१७ रुग्णांची नोंद झालीे. आज शनिवारी (१५ जानेवारी) त्यात आणखी घट होऊन १० हजार ६६१ रुग्णांची नोंद झाली आहे. आज ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ७३ हजार ५१८ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत आज (१५ जानेवारीला) १० हजार ६६१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ११ मृत्यूची नोंद झाली आहे. आज २१,४७४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ९ लाख ९१ हजार ९६७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ८ लाख ९९ हजार ३५८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ४४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ७३ हजार ५१८ वर पोहचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४३ दिवस इतका आहे. मुंबईमधील ५८ इमारती सील आहेत. ८ जानेवारी ते १४ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर १.५६ टक्के इतका आहे.
८४.३ टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या १० हजार ६६१ रुग्णांपैकी ८ हजार ९५५ म्हणजेच ८४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ७२२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. १११ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३८,११७ बेड्स असून त्यापैकी ५९६२ बेडवर म्हणजेच १५.७ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ८४.३ टक्के बेड रिक्त आहेत.
अशी वाढली रुग्णसंख्या -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १३७७, २९ डिसेंबरला २५१०, ३० डिसेंबर ३६७१, ३१ डिसेंबरला ५६३१, १ जानेवारीला ६३४७, २ जानेवारीला ८०६३, ३ जानेवारीला ८०८२, ४ जानेवारीला १०८६०, ५ जानेवारीला १५,१६६, ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१, ८ जानेवारीला २०,३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून ९ जानेवारीला १९४७४, १० जानेवारीला १३६४८, ११ जानेवारीला ११६४७, १२ जानेवारीला १६४२०, १३ जानेवारीला १३७०२, १४ जानेवारीला ११३१७, १५ जानेवारीला १०६६१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
धारावीत ४० रुग्ण -
मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. धारावीत ३० डिसेंबरला २०, ३१ डिसेंबरला ३४, १ जानेवारीला २४, २ जानेवारीला ६०, ३ जानेवारीला ४१, ४ जानेवारीला ४०, ५ जानेवारीला ८१, ६ जानेवारीला १०७, ७ जानेवारीला १५०, ८ जानेवारीला १४७, ९ जानेवारीला १२३, १० जानेवारीला ९७, ११ जानेवारीला ५१, १२ जानेवारीला ६९, १३ जानेवारीला ४९, १४ जानेवारीला ३२, १५ जानेवारीला ४० रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत एकूण ८३८४ रुग्ण असून ७५६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या ४६१ सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा - Mumbai Corona Cases Increased : मुंबईत लॉकडाऊनची धास्ती? पाहा काय आहे परिस्थिती...