मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १२ हजार ४५२ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ९७८ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ७.८५ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान १८९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख १३ हजार ४७० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ८४ हजार १४८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ९ हजार ७१० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५२६ दिवस इतका आहे. आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१२५ टक्के इतका आहे.
२४ रुग्ण व्हेंटिलेटरवर : मुंबईत आज आढळून आलेल्या ९७८ रुग्णांपैकी ९२४ म्हणजेच ९४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ८७८ बेड्स असून त्यापैकी ५९४ बेडवर रुग्ण आहेत. ६६ रुग्ण ऑक्सिजनवर, १२० रुग्ण आयसीयूमध्ये तर २४ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसात रुग्णांचा आकडा 2 हजारावर गेला होता आता तो 1 हजाराच्या खाली आला आहे.
१०६ वेळा शून्य मृत्यूची नोंद: मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १०६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा तर जून महिन्यात ७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
रुग्णसंख्या घटली: मुंबईत दोन वर्षात कोरोनाच्या दोन लाटा आल्या. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. तीसऱ्या लाटेत ६ ते ८ जानेवारी दरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. मे महिन्याच्या अखेरीस ३१ मे ला ५०६, १ जून ला ७३९, २ जून ला ७०४, ३ जूनला ७६३, ४ जून ला ८८९, ५ जून ला ९६१, ७ जून ला १२४२, ८ जूनला १७६५, १२ जूनला १८०३, १३ जूनला १११८, १४ जूनला १७२४, १५ जूनला २२९३, १६ जूनला २३६६, १७ जूनला २२५५, १८ जूनला २०५४, १९ जूनला २०८७, २० जूनला १३१०, २१ जूनला १७८१, २२ जूनला १७४८, २३ जूनला २४७९, २४ जूनला १८९८, २५ जूनला ८४०, २६ जुनला १७००, २७ जुनला १०६२, २८ जुनला १२९०, २९ जुनला १५०४, ३० जुनला १२६५, १ जुलैला ९७८ रुग्णांची नोंद झाली आहे.