मुंबई : सध्या राज्यभरात १७७ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. दरम्यान विमानतळावर कोरोना पॉजिटीव्ह आढळुन आलेल्या ३५ रुग्णांचे अहवाल जिनोम सिक्वेन्सीग चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात काल २६ फेब्रुवारी रोजी ३५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८ कोटी ६४ लाख १९ हजार ३८१ नमुन्यांपैकी ८१ लाख ३७ हजार ५८३ म्हणजेच ९.४२ टक्के नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.
या जिल्ह्यात रुग्ण : रविवारी आढळून आलेल्या ३५ नवीन रुग्णांपैकी मुंबईमधील १२, ठाणे पालिका हद्दीतील ६, नाशिक येथील ३, अहमदनगर पालिका येथील २, पुणे येथील १, पुणे महापालिका हद्दीतील ७, सांगली येथील १, रत्नागिरी येथील २, वाशिम येथील १ रुग्णाचा समावेश आहे. १७७ ऍक्टिव्ह रुग्णापैकी सर्वाधिक रुग्ण पुणे येथे ७०, मुंबईत ४२, ठाणे १९, वाशीम मध्ये १२ रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत ७९ लाख ८८ हजार ९८५ बरे होऊन घरी गेले आहेत.
३५ प्रवाशांची जिनोम सिक्वेन्सिंग : कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे २४ डिसेंबर २०२२ पासून भारत सरकारच्या सूचनेनुसार मुंबई, पुणे, नागपूर, आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. दोन टक्के प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग केले जात आहे. कोरोना बाधित आढळून येणाऱ्या प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात आहेत. विमानतळावर रविवारपर्यंत २४,६३७ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली होती. त्यामधील ३५ प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेन्सीसाठी पाठवण्यात आलेले आहेत.
येथील रुग्णांची जिनोम सिक्वेन्सिंग : आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या जिनोम सिक्वेन्सिंग ३५ रुग्णांपैकी मुंबईतील ८, पुणे येथील ४, नवी मुंबई, अमरावती, सांगली, औरंगाबाद, सातारा प्रत्येकी १, गुजरात ५, केरळ उत्तर प्रदेश तामिळनाडू राजस्थान ओडीसा प्रत्येकी २, गोवा आसाम तेलंगणा येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. महाराष्ट्र राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१७ टक्के इतके आहे. रविवारी 26 फेब्रुवारी रोजी ८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
मुंबईत १२ नवे रुग्ण : मुंबईत रविवारी १२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. गेल्या तीन वर्षांत ११ लाख ५५ हजार ३६२ रुग्णांची नोंद झाली आहे. ११ लाख ३५ हजार ५७३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९८.०३ टक्के इतका आहे. सध्या ४२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. परंतु एकही मृत्यु न झाल्यामुळे दिलासादायक वातावरण आहे. मागील काही काळात थैमान घातलेल्या कोरोनाचा प्रसार सध्या कमी दिसून येत आहे.