मुंबई : गेल्या काही दिवसात मुंबईतील कोरोनाचा प्रसार आटोक्यात (corona spread under control in Mumbai) आला आहे. गेले तीन ते चार दिवस एक आकडी रुग्णांची नोंद होत होती. आज त्यात वाढ होऊन १६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद (16 new corona patients registered) झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद (zero corona deaths record) झाली असून अडीच वर्षांत १८२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मागील काही दिवसात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या (number of active corona patients) वाढली होती. (Latest news from Mumbai) त्यातही घट होऊन ५१ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोनाचे १६ नवे रुग्ण : मुंबईत ४ डिसेंबरला २९३२ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १६ रुग्णांची नोंद झाली. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. १६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ५४ हजार ९४० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३५ हजार १४५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १,०९,१५४ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००१ टक्के इतका आहे.
रुग्णसंख्येत उतार सुरू : मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊ लागली आहे.१७ नोव्हेंबरला २६, १८ नोव्हेंबरला १३, १९ नोव्हेंबरला ८, २० नोव्हेंबरला १५, २१ नोव्हेंबरला १०, २२ नोव्हेंबरला १२, २३ नोव्हेंबरला १४, २४ नोव्हेंबरला १०, २५ नोव्हेंबरला १८, २६ नोव्हेंबरला १५, २७ नोव्हेंबरला १६, २८ नोव्हेंबरला ६, २९ नोव्हेंबरला ६, ३० नोव्हेंबरला ८, १ डिसेंबरला २, ३ डिसेंबरला ८, ४ डिसेंबरला १६ रुग्णांची नोंद झाली आहे.
१८२ वेळा शून्य मृत्यूची नोंद : मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा, ऑगस्ट महिन्यात ७ वेळा, सप्टेंबर महिन्यात ११ वेळा, ऑक्टोबर महिन्यात २४ वेळा, नोव्हेंबर महिन्यात २४ वेळा, डिसेंबर महिन्यात ४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १८२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.