ETV Bharat / state

ब्रिटनवरून परतलेले 12 पैकी 6 रुग्ण झाले बरे

author img

By

Published : Dec 29, 2020, 9:22 PM IST

Updated : Dec 29, 2020, 10:00 PM IST

ब्रिटनवरून आलेल्या आणि सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 12 रुग्णांपैकी 6 रुग्ण बरे झाले आहेत. यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे. हे रुग्ण बरे झाले असले तरी त्यांचा पुणे प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मुंबई
मुंबई

मुंबई - आज आयसीएआरएने जाहीर केलेल्या अहवालानुसार देशात 6 रुग्ण नव्या कोरोनाचे आढळले आहेत. यात महाराष्ट्रातील एकही रुग्ण नसून ही दिलासादायक बाब असताना मुंबई-महाराष्ट्रासाठी आणखी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे ब्रिटनवरून आलेल्या आणि सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 12 रुग्णांपैकी 6 रुग्ण बरे झाले आहेत. यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे. हे रुग्ण बरे झाले असले तरी त्यांचा पुणे प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. हे नव्या कोरोनाचे रुग्ण असतील आणि जर ते लवकरात-लवकर बरे होत असतील तर ही दिलासादायक बाब ठरणार आहे.

ब्रिटनमधून आलेले ते रुग्ण सेव्हन हिल्समध्ये घेताहेत उपचार

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू प्रकार आढळला आहे. हा विषाणू आधीच्या कोरोनापेक्षा घातक आहे. कारण हा कोरोना 70 टक्के वेगाने पसरतो. त्यामुळे भारतात कोरोना नियंत्रणात येत असताना आता या कोरोनाचा शिरकाव झाला आहे. देशात 6 रुग्ण नव्या कोरोनाचे आढळले आहेत. राज्यातील रुग्णांचा अहवाल अजून आलेला नाही. राज्यात 21 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. यातील 12 जण मुंबईतील आहेत. मुंबईत ब्रिटनवरून आलेले 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या रुग्णांवर पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

6 जण झाले बरे

या 12 जणांवर उपचार सुरू असून कोरोना सद्या भारतात असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना जे उपचार दिले जातात. तेच उपचार या रुग्णांना दिले जात आहेत. त्यानुसार आता 6 रुग्ण बरे झाले आहेत. त्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी दिलासादायक माहिती काकाणी यांनी दिली आहे. मात्र, या रुग्णांना बरे झाले म्हणून डिस्चार्ज देण्यात आलेला नाही वा देण्यात येणार नाही. पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही काकाणी यांनी दिली आहे. तर हे रुग्ण नव्या कोरोनाचे रुग्ण आहेत का, हे अजून स्पष्ट नाही. पण, या नव्या कोरोनाचे हे संशयित रुग्ण बरे होत असल्याने या नव्या कोरोनामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त काळजी घेणे आणि नियम पाळणे गरजेचे आहे, असेही काकाणी यांनी सांगितले आहे.

Last Updated : Dec 29, 2020, 10:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.