ETV Bharat / state

Mumbai Corona : मुंबईत ५ जुलैनंतरही तिसऱ्या स्थराचे निर्बंध, सायंकाळी ५ नंतर संचारबंदी

author img

By

Published : Jul 3, 2021, 8:58 PM IST

मुंबईत कोरोना पूर्णपणे संपला नाही. त्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईत ५ जुलैनंतरही तिसऱ्या स्थराचे निर्बंध लागू राहणार आहेत. याबाबतचे परिपत्रक मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी काढले आहे. दरम्यान, मुंबईत सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी, तर ५ नंतर संचारबंदी असणार आहे.

मुंबई
मुंबई

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. तसेच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबईतही ५ जुलैनंतरही तिसऱ्या स्थराचे निर्बंध लागू राहतील, असे परिपत्रक पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी काढले आहे. या परिपत्रकानुसार दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. ५ वाजल्यानंतर संचारबंदी लागू असणार आहे. सामान्य मुंबईकरांना रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा नाही. त्यामुळे प्रवासासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट झाला कमी -

मुंबई महापालिकेच्या हद्दीत गेले दोन आठवडे ३.६६ टक्के इतका पॉझिटिव्हीटी रेट आहे. तसेच २३.१६ टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण आहेत. त्याआधी गेले दोन आठवडे ३.९६ टक्के इतका पॉझिटिव्हीटी रेट, तर २६.४ टक्के इतक्या ऑक्सिजन बेडवर रुग्ण होते. ११ जून ते १८ जून या आठ दिवसात पॉझिटिव्हिटी रेट ३.७९ टक्के इतका होता. २३.५६ टक्के बेडवर रुग्ण होते. मुंबईत पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या मागील आठवड्यापेक्षा कमी झाली आहे. तरीही मुंबईची भौगोलिक रचना व लोकसंख्या, लोकल ट्रेनने बाजूच्या जिल्ह्यातून दाटीवाटीने मोठ्या प्रमाणात येणारे प्रवासी आणि टास्क फोर्सने अंदाज वर्तवल्यानुसार तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईमध्ये तिसऱ्या स्थराचे निर्बंध लागू राहतील, असे परिपत्रकात म्हटले आहे.

आतापर्यंतचा पॉझिटिव्हिटी रेट -

मुंबईत ४ ते ११ जून या आठ दिवसांच्या कालावधीत २ लाख ६९ हजार ५६९ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ११ हजार ८७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. यामुळे पॉजिटिव्हिटी रेट ४.४० टक्के इतका होता. याच कालावधीत १२ हजार ५९३ ऑक्सिजन बेड्सपैकी ३ हजार ४१६ बेड्सवर रुग्ण होते. तर ९ हजार १७७ बेड्स रिक्त होते. एकूण बेड्सपैकी २७.१२ टक्के बेड्सवर रुग्ण होते. यामुळे मुंबईचा समावेश दुसऱ्या स्थरात झाला होता. ११ ते १८ जून या कालावधीत १२ हजार ५९३ पैकी ९ हजार ६२६ ऑक्सिजन बेड रिक्त होते. २ हजार ९६७ ऑक्सिजन बेडवर रुग्ण होते. मुंबईत २३.५६ टक्के बेडवर रुग्ण असल्याने राज्य सरकारच्या ब्रेक द चेन नियमानुसार मुंबईचा समावेश पहिल्या स्थरात झाला होता. १८ ते २५ जून या कालावधीत गेल्या दोन आठवड्यात ३.९६ टक्के इतका पॉझिटिव्हीटी रेट, तसेच २६.४ टक्के इतक्या ऑक्सिजन बेडवर रुग्ण होते.

लोकल रेल्वे अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच -

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा आहे. मुंबईत मागील आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्याने सामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, नव्याने आलेला कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा नसणार आहे.

मुंबईत काय सुरु, काय बंद?

- सर्व दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत खुली राहणार
- मॉल, थिएटर, नाट्यगृह बंद राहणार
- मैदाने आणि बगीचे पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत खुली राहणार
- महत्त्वाची खासगी कार्यालये 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार, तर शासकीय कार्यालय ५० टक्के उपस्थितीत सुरू राहणार
- लग्नासाठी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी
- अंत्यविधीसाठी २० लोकांना परवानगी
- महत्त्वाच्या मिटिंगसाठी ५० टक्के उपस्थिती, केवळ बांधकाम स्थळी काम करणाऱ्या मजूर आणि कर्मचाऱ्यांना मुभा
- शेतीविषयक कामे 4 वाजेपर्यंत करण्यास मुभा
- सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी, ५ नंतर संचारबंदी
- जिम, सलून आणि ब्युटी पार्लर सायंकाळी 4 वाजेपर्यंत केवळ ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहणार
- सार्वजनिक वाहतूक आसन क्षमतेनुसार सुरू राहणार

हेही वाचा - दोन विवाह झालेला अन् १६ वर्षीय मुलीचा बाप असलेला कराटे शिक्षक १८ वर्षाच्या तरुणीसोबत 'लिव इन'मध्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.