ETV Bharat / state

दिलासादायक...मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 39 दिवसांवर - कोरोना केसेस दुप्पट होण्याचा दर

राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. आता मात्र मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पटीचा वेग 39 दिवसांवर गेला आहे. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी वेग 1.81 वर आहे.

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 24, 2020, 5:49 PM IST

मुंबई- मुंबईत दररोज कोरोनाचे हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. मात्र,मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 39 दिवसांवर गेला आहे. मुंबईमधील रुग्णवाढीचा सरासरी दर 1.81 टक्के इतका राहिला आहे. वांद्रे खार येथील एच पूर्व विभाग कोरोना संसर्गाला रोखण्यात आघाडीवर राहिला आहे. या विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 88 दिवसांवर पोहचलाय.

मुंबईत 1 जून रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 18 दिवसांवर होता.10 जूनला हा कालावधी 25 दिवसांवर गेला. आता हा दर 39 दिवसांवर गेला आहे. मुंबईमधील वांद्रे व खार पूर्व विभागात येणा-या एच पूर्व विभागाचा कालावधी 88 दिवसांवर गेला आहे. माटुंगा येथील एफ उत्तर विभागात रुग्ण दुप्पटीचा कालावधी 82 तर भायखळा येथील ई विभागाचा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 74 दिवसांवर गेला आहे. कुर्ल्याच्या एल वॉर्डमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 70 दिवसांवर पोहचला आहे.

रूग्ण वाढीचा सरासरी दरही आणखी कमी होऊन आता 1.81 टक्के असा आहे. 1 टक्के पेक्षा कमी रूग्णवाढीचा सरासरी दर नोंदवणारा एच पूर्व विभाग यापूर्वी हा पहिला विभाग ठरला होता. आज एच पूर्वचा रूण वाढीचा सरासरी दर 0.8 टक्के असा असून एफ उत्तर आणि ई विभागांचा रूग्ण वाढीचा सरासरी दर 0.9 टक्के असा झाला आहे. एल विभागातही हा सरासरी दर 1 टक्केवर आला आहे. रूग्णवाढीचा सरासरी दर 24 विभागांपैकी 3 विभागात 1 टक्के पेक्षा कमी तर 10 विभागांत 2 टक्के पेक्षा कमी आहे. या पैकी 8 विभागातील सरासरी दर दीड टक्क्यांपेक्षा कमी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.