ETV Bharat / state

Bhai Jagtap on Shivjayanti : शिवजयंती तिथीनुसार घराघरात साजरी करा - भाई जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - भाई जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र शिवजयंती

दरवर्षी शिवजयंती तारखेनुसार १९ फेब्रुवारीला साजरी केली जाते. ( Shivjayanti 2022 ) हिंदू संस्कृतीमध्ये तिथीनुसार कोणताही सण साजरा केला जातो. यंदा तिथीनुसार शिवजयंती २१ मार्च रोजी आहे. याबाबत मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप ( Mumbai Congress President Bhai Jagtap ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ( Cm Uddhav Thackeray ) पत्र लिहून तिथीनुसार शिवजयंती घराघरात साजरी केली जावी, अशी विनंती केली आहे.

Bhai Jagtap
भाई जगताप
author img

By

Published : Mar 20, 2022, 7:14 PM IST

मुंबई - दरवर्षी शिवजयंती तारखेनुसार १९ फेब्रुवारीला साजरी केली जाते. ( Shivjayanti 2022 ) हिंदू संस्कृतीमध्ये तिथीनुसार कोणताही सण साजरा केला जातो. यंदा तिथीनुसार शिवजयंती २१ मार्च रोजी आहे. याबाबत मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप ( Mumbai Congress President Bhai Jagtap ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ( Cm Uddhav Thackeray ) पत्र लिहून तिथीनुसार शिवजयंती घराघरात साजरी केली जावी, अशी विनंती केली आहे.

काय आहे पत्रात?

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव (शिवजयंती) आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी १९ फेब्रुवारीला शासकीय स्तरावर मोठ्या उत्साहाने साजरा करतो व त्या दिवशी सार्वजनिक स्वरूपातही मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी होत असते. तसेच तिथीनुसारही (फाल्गुन कृष्ण चतुर्थी) काही शिवप्रेमी शिवजयंती साजरी करतात. मात्र, तिथीनुसार (फाल्गुन कृष्ण चतुर्थीला) सार्वजनिक स्वरूपात साजरी न करता प्रत्येक घरात शिवजयंती साजरी करून सणाचे स्वरूप प्राप्त करून देऊन पुरोगामी महाराष्ट्राला साजेसा पायंडा पाडू.

'शिवजयंती घराघरात, शिवजयंती मनामनात...' या उक्तीप्रमाणे व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली "शिवप्रेरणा" आपण सर्वजण घेऊया. तरी आपण या युगपुरूषाचा गौरव करण्याकरीता आपल्या वर्षा निवासस्थानापासून सुरूवात करून सर्व लोकप्रतिनिधींसह यात सहभागी होऊन शिवप्रेमी व महाराष्ट्राच्या जनतेला शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनकारी वातावरण निर्माण करून तिथीनुसार शिवजयंती प्रत्येक घरात साजरी करण्यास आवाहन करावे, अशी विनंती भाई जगताप यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray : आम्ही आरएसएसला मुस्लिम संघ म्हणायचं का? भाजपला सोडलंय, हिंदुत्वाला नाही.. पहा उद्धव ठाकरेंचे संपूर्ण भाषण..

शिवजयंती, तारीख, तिथी आणि वाद -

महाराष्ट्रातील सरकारने २००१ या वर्षी फाल्गुन वद्य तृतीया,१५३१ म्हणजेच शुक्रवार १९ फेब्रुवारी १६३० ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख म्हणून ग्राह्य धरण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे सरकारकडून देखील याच दिवशी शिवजयंती साजरी केली जाते. तसेच या दिवशी सार्वजनिक सुट्टी देखील दिली जाते. तसेच या तारखेशिवाय संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) या तारखेचा समावेश आहे. त्यामुळे अनेक शिवप्रेमी एप्रिल महिन्यात देखील शिवजयंती साजरी करतात. मात्र, महाराष्ट्रात आणि देशात प्रामुख्याने १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. महाराष्ट्रामध्ये अनेक शिवभक्त मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून साजरा करतात. शिवजयंती साजरी करण्यावर दोन गट असल्याचे पाहायला मिळते. काहीजण शिवजयंती तारखेनुसार साजरे करतात. तर काहीजण शिवजयंती तिथीनुसार साजरी करतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.