ETV Bharat / state

छोट्या व्यवसायिकांना नियम पाळून व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी - भाई जगताप - मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप

सर्व व्यापारी व दुकानदार शासनाचे सर्व नियम, अटी व निर्बंध पाळण्यास तयार आहेत. तसेच त्यांच्याजवळ काम करणाऱ्या कामगारांची RTPCR टेस्टसुद्धा ते स्वतःहून करण्यास तयार आहेत.

भाई जगताप
भाई जगताप
author img

By

Published : Apr 9, 2021, 12:24 PM IST

Updated : Apr 9, 2021, 2:21 PM IST

मुंबई - गेल्या वर्षभरात कोरोनामुळे व्यवसायिक आणि दुकादारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून ते कसेबसे सावरत आहेत. पण पुन्हा लावण्यात आलेल्या मिनि लॉकडाऊनमुळे व्यवसायिक आणि दुकानदार आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमावली पाळून व्यसायिक आणि दुकानदारांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुंबई काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागणीचे पत्रही मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाई जगताप

हेही वाचा - जम्मू काश्मीरमध्ये दोन ठिकाणी चकमक; पाच दहशतवाद्यांचा खात्मा

नियम पाळून व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी

सर्व व्यापारी व दुकानदार शासनाचे सर्व नियम, अटी व निर्बंध पाळण्यास तयार आहेत. तसेच त्यांच्याजवळ काम करणाऱ्या कामगारांची RTPCR टेस्टसुद्धा ते स्वतःहून करण्यास तयार आहेत. त्यामुळे राज्य सरकारकने या दुकानदार व कामगारांना त्यांचा शासनाच्या सर्व अटी व निर्बंधांसह व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून त्यांच्याजवळ काम करणाऱ्या लाखो कामगारांचे रोजगार वाचतील, असे जगताप म्हणाले.

हेही वाचा - मीरा रोड, वसईतील फार्म हाऊसवर झाली होती वाझे आणि शिंदेंची बैठक, एनआयएचा दावा

राज्यात रक्ताचा तुडवडा

राज्यामध्ये कोविडचा प्रादुर्भाव खूप पसरलेला आहे. संपूर्ण राज्यभरात कोविड रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. राज्य सरकारकडून रक्तदानाचे वारंवार आवाहन केले जात आहे. राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत १० एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत १० हजार बाटल्या रक्त संकलित करण्याचा निर्णय मुंबई काँग्रेसने घेतलेला आहे. मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील ३६ विधानसभा क्षेत्रांमध्ये या कालावधीत रक्तदान शिबीर आयोजित केले जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे स्थानिक नेते व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी त्या त्या विभागात रक्तदान शिबिरांचे संकलन करतील. पहिले रक्तदान शिबीर १२ एप्रिल रोजी उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये मालाड-मालवणी विभागात घेतले जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

Last Updated : Apr 9, 2021, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.