ETV Bharat / state

महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू अतिरिक्त कामामुळे नाही; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

शिवडी विधानसभा क्षेत्रात निवडणूक कामानिमित्त कार्यरत असलेल्या राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या कर्मचारी प्रिती दुर्वे यांचे काल (शुक्रवार) निधन झाले. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे.

अतिरिक्त कामामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू नाही; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
author img

By

Published : May 11, 2019, 6:38 PM IST

मुंबई - मंत्रालयातील सांस्कृतिक विभागातील कर्मचारी प्रिती अत्राम-दुर्वे (वय ३१) यांचे लोकसभा निवडणुकीच्या अतिरिक्त कामामुळे मृत्यू झाला नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले आहे. निवडणूक कामातून मुक्त करावे, असा कोणताही अर्ज दुर्वे यांनी केला नव्हता. ऑन ड्युटी असल्याने त्यांच्या कुटुंबाला 15 लाखाची मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिरिक्त कामामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू नाही; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

शिवडी विधानसभा क्षेत्रात निवडणूक कामानिमित्त कार्यरत असलेल्या राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या कर्मचारी प्रिती दुर्वे यांचे काल (शुक्रवार) निधन झाले. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. त्या आजारी असल्याबद्दल त्यांनी निवडणूक विभागास सांगितले नव्हते. निवडणूक कामातून मुक्त करण्यात यावे असे कोणतेही निवेदन त्यांच्याकडून कार्यालयाला प्राप्त झालेले नव्हते. निवडणूक विभागाकडे राखीव कर्मचारी असतात. त्यामुळे अशी विनंती प्राप्त झाल्यास संबंधितास निवडणूक कामातून मुक्त करण्यात येते, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

मतदानाच्या दिवशी तब्येत ठीक वाटत नसल्याने प्रिती दुर्वे यांना झोनल आॅफिसरने रुग्णालयात जावे असे सुचवले असता त्यांनी आपल्याला घरी जायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी दुर्वे यांना रेल्वे स्थानकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. तसेच त्या रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती कळाल्यावर सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन वेळा त्यांची भेटही घेतली होती. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात येईल. निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती संदर्भात संबंधीत कार्यालयाला सेवार्थच्या आधारे यादी पाठवण्यात आली होती. या यादीतील कर्मचार्‍यांबाबत काही अडचण असल्यास ती कळविण्यात यावी असेही सूचित केले होते, असे जिल्हाधिकारी म्हणाले

संबंधित विभागांकडून तशी माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सुचवलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात आले. तसेच वैयक्तिक अर्ज घेऊन आजारपणाबाबत ज्यांनी विनंती केली त्या कर्मचाऱ्यांनाही या निवडणुकीच्या कामातून मुक्त करण्यात आले होते. जवळपास 1 हजार 900 कर्मचारी या प्रक्रियेतून वगळले आहेत. मुंबई शहर निवडणूक कार्यालयाकडे राखीव कर्मचारी होते. त्यामुळे आजारपणाबद्दल कोणी अर्ज केल्यास तो अर्ज मान्य करून संबंधितांना निवडणूक कामातून मुक्त केल्याचे जिल्हाधिकारी जोंधळे यांनी सांगितले.

Intro:मुंबई ।

मंत्रालयातील सांस्कृतिक विभागातील कर्मचारी प्रीती अत्राम-दुर्वे (वय ३१) यांचे लोकसभा निवडणुकीच्या अतिरिक्त कामामुळे मृत्यू झाला नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले.
निवडणूक कामातून मुक्त करावे, असा कोणताही अर्ज धुर्वे यांनी केला नव्हता. ऑन ड्युटी असल्याने त्यांच्या कुटूंबाला 15 लाखाची मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
Body:शिवडी विधानसभा क्षेत्रात निवडणूक कामानिमित्त कार्यरत असलेल्या राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या कर्मचारी प्रिती दुर्वे यांचे आज निधन झाले, ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. त्या आजारी असल्याबद्दल त्यांनी निवडणूक विभागास सांगितले नव्हते. निवडणूक कामातुन मुक्त करण्यात यावे असे कोणतेही निवेदन त्यांच्या कडून कार्यालयास प्राप्त झालेले नव्हते. निवडणूक विभागाकडे राखीव कर्मचारी असतात. त्यामुळे अशी विनंती प्राप्त झाल्यास संबंधितास निवडणूक कामातून मुक्त करण्यात येते,अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

मतदानाच्या दिवशी तब्येत ठिक वाटत नसल्याने प्रीती दुर्वे यांना झोनल आॅफिसरने रुग्णालयात जावे असे सुचवले असता त्यांनी आपल्याला घरी जायचे असल्याचे सांगितले.
त्यामुळे सहायक निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दुर्वे यांना रेल्वे स्थानकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली. तसेच त्या रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती कळाल्यावर सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन वेळा त्यांची भेटही घेतली होती . निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात येईल. निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती संदर्भात संबंधित कार्यालयाला सेवार्थच्या आधारे यादी पाठवण्यात आली होती. या यादीतील कर्मचार्‍यांच्या बाबत काही अडचण असल्यास ती कळविण्यात यावी असेही सूचित केले होते, असे जिल्हाधिकारी म्हणाले
संबंधित विभागांकडून तशी माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सुचवलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात आले. तसेच वैयक्तिक अर्ज घेऊन आजारपणाबाबत ज्यांनी विनंती केली त्या कर्मचाऱ्यांनाही या निवडणुकीच्या कामातून मुक्त करण्यात आले होते. जवळपास 1900 कर्मचारी या प्रक्रियेतून वगळले आहेत. मुंबई शहर निवडणूक कार्यालयाकडे राखीव कर्मचारी होते. त्यामुळे आजारपणाबद्दल कोणी अर्ज केल्यास तो अर्ज मान्य करून संबंधितांना निवडणूक कामातून मुक्त केले होते. असे जिल्हाधिकारी जोंधळे यांनी सांगितलेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.